शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : प्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंत, सावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:50 IST

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सावंतवाडी तालुक्यात मजबूत होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मतदार संघनिहाय विभागीय निरीक्षकांची निवड शनिवारी येथे झालेल्या मासिक बैठकीत करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाला न्याय द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.

ठळक मुद्देप्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंतसावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

सावंतवाडी : राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सावंतवाडी तालुक्यात मजबूत होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मतदार संघनिहाय विभागीय निरीक्षकांची निवड शनिवारी येथे झालेल्या मासिक बैठकीत करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाला न्याय द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रांतिक सदस्य जयेंद्र परूळेकर, जिल्हा चिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शहरअध्यक्ष बाबल्या दुभाषी, विभावरी सुकी, अण्णा केसरकर आदी उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विकास सावंत म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पुन्हा बांधणी करायची आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तशी तयारी करायची असून कार्यकर्त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबर पक्ष वाढीसाठी करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मतदार संघनिहाय दहा विभागीय निरीक्षक व चार विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली.विभागीय निरीक्षकांमध्ये इन्सुली-आबा सावंत, आरोंदा-विजय कुुडतरकर, माडखोल-आनंद परूळेकर, तळवडे-विकास नाईक, मळेवाड-बाळा जाधव, बांदा- रवींद्र म्हापसेकर, कोलगाव-बाळा गावडे, आंबोली-अभय किनळोस्कर, माजगाव-दिगंबर परब, सावंतवाडी-विभावरी सुकी यांची तर विभागीय अध्यक्षांमध्ये संदीप कोठावळे-इन्सुली, प्रसाद मांजरेकर-आरोंदा, रमाकांत राऊळ-माडखोल, विष्णू परब-तळवडे आदीचंी निवड करण्यात आली. यावेळी राजू मसुरकर, बाबल्या दुभाषी आदींनी मार्गदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष घेणार नाणारवासीयांची भेटप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, हुसेन दलवाई आदी २ मे रोजी नाणार दौºयावर येत असून ते नाणारवासीयांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग