शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:03 IST

चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ठळक मुद्दे९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, चांदा ते बांदा नावीन्यपूर्ण योजना शाश्वत विकास करणे हेच योजनेचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गनगरी : चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे.राज्याच्या दोन टोकांवर असलेल्या परंतु नैसर्गिक व्यवसायाने प्रगत असणाऱ्या सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी ९ जून २०१६ रोजी सरकारने शासन निर्णय जारी केला. चांदा ते बांदा असे या योजनेला नाव देऊन वित्त राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.योजनेच्या अंमलबजावणीसाठी केसरकर यांनी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बैठका घेतल्या. अखेर शासनाने खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा योजनेंतर्गत तब्बल ९५ कोटी रुपये मंजूर करून ते प्राप्तदेखील झाले आहेत. यातील मच्छिमारांना आऊट बोटसाठी ५२ लाखांचे वाटप केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिमार व्यवसाय, काजू उद्योग, काथ्या व्यवसाय, शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातही नैसर्गिक व्यवसाय व्यापक प्रमाणावर आहेत. या नैसर्गिक व्यवसायांना जर आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास साधला तर हे दोन जिल्हे समृद्ध होऊ शकतील म्हणून राज्यात चांदा ते बांदा ही योजना सुरू झाली.

चांदा ते बांदा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने जिल्हा समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. या पदावर जिल्हा समन्वयक म्हणून जी. एस. धनावडे हजर झाले आहेत. हे जिल्हा कार्यालय जिल्हा नियोजन विभागात आहे.२0२0 पर्यंत निधी खर्च करणे बंधनकारक२0२0 पर्यंत हा निधी खर्च करणे बंधनकारक आहे. यापूर्वी हा निधी खर्च झाल्यास दुसऱ्या टप्प्यात आणखीन निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निधी विविध योजनांवर खर्च केला जाणार आहे. सन २0१७-१८ या आर्थिक वर्षात चांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्गसाठी ९५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Planning Commissionनियोजन आयोगsindhudurgसिंधुदुर्ग