शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : चार सार्वत्रिक, एक पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:52 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

ठळक मुद्देचार सार्वत्रिक, एक पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर २६ सप्टेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.मुदत संपलेल्या राज्यातील १०४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीची सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक होत आहे.

सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील बोडन या ग्रामपंचायतीच्या ७ सदस्य पदांसाठी निवडणूक होत असून, या ग्रामपंचायतसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी सरपंचपद राखीव आहे. तर कुडासे- खुर्द या ग्रामपंचायतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हे सरपंच पद राखीव असून या ग्रामपंचायत साठी ७ सदस्य संख्या आहे.

साटेली- भेडशी या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव असून, या ठिकाणी ११ सदस्य संख्या आहे. देवगड तालुक्यातील ठाकुरवाडी या ग्रामपंचायतसाठी ७ सदस्य संख्या असून या साठी सरपंच पद हे अनुसूचित जाती स्त्री राखीव आहे.या आहेत ग्रामपंचायतीदोडामार्ग तालुक्यातील बोडण, कुडासे-खुर्द, आणि साटेली -भेडशी तर देवगड तालुक्यातील ठाकुरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा या ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे.२७ रोजी होणार मतमोजणीया निवडणुकीसाठी ५ सप्टेंबर २०१८ ते १ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरणे, १२ सप्टेंबर अर्जांची छाननी, १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि त्याच दिवशी निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. तर २६ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता सुरु झाली आहे.मडुऱ्यात पोटनिवडणूकसावंतवाडी तालुक्यातील मडुरे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वेदिका मडूरकर या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या राखीव जागेवरून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी आपल्या सरपंच या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त सरपंच पदासाठीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग