शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जबरदस्तीने धर्मांतर; कारवाई करा, नीतेश राणेंची पोलिसांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:37 IST

पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.

ठळक मुद्दे जबरदस्तीने धर्मांतर; कारवाई करा, नीतेश राणेंची पोलिसांकडे मागणीदोडामार्गमध्ये हिंदूंचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर प्रकरण

दोडामार्ग : दोडामार्गमध्ये धर्मांतरावरून सुरू झालेल्या वादास जर पोलीसच साथ देत असतील तर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आज शहरात हा प्रकार घडला, यापुढे तालुक्याच्या ग्रामीण भागातही असे प्रकार घडतील. त्यामुळे पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.दोन दिवसांपूर्वीच दोडामार्ग शहरात हिंदू धर्मीयांचे ख्रिस्ती धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यावरून वाद निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गोपाळ गावडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला भेट देत प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी चर्चा केली.हिंंदू धर्मीयांचे जबरदस्तीने ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रकार आज दोडामार्ग शहरात घडला. तो प्रकार पुढे ग्रामीण भागातही घडू शकतो. त्यामुळे याला वेळीच आवर घालायला हवा. पोलिसांनी याची पाळेमुळे खोदून काढली पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी हिंदू धर्मीयांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते चुकीचे आहे. जे त्यावेळी हजर नव्हते, अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत.

जर पोलीसच जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना साथ देत असतील, तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे कोणती कारवाई होते आणि कोणाची नावे वगळली जातात याकडे लक्ष लागून राहिले आहे.सखोल चौकशीअंती त्यांची नावे वगळणारकसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी पोलिसांना याबाबत चार महिन्यांपूर्वी कल्पना दिली होती. मात्र त्यांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच हा प्रकार निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला.यावर जयदीप कळेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून जे घटनेवेळी उपस्थित नव्हते त्यांची नावे गुन्ह्यातून वगळली जातील, अशी ग्वाही दिली.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे माजी तालुकाध्यक्ष रमेश दळवी, कसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, राजू निंबाळकर, विठोबा पालयेकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग