शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

सिंधुदुर्ग : मच्छिमारांच्या फसलेल्या नौकाही बाहेर काढणार, ओखी वादळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 18:22 IST

ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत स्थिरावणार आहेत.

ठळक मुद्दे मांडवीच्या मुखाशी साचलेला गाळ काढणे सुरूसंरक्षक भाग खचला

वेंगुर्ले : ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत स्थिरावणार आहेत.वेंगुर्ले किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा बसल्याने मांडवी खाडीत गाळ साचून चाळीस बोटी त्यात फसल्या होत्या. खाडीचे मुख गाळाने पूर्णपणे भरल्याने येथील मच्छिमारांच्या छोट्यामोठ्या नौका समुद्र्रात असुरक्षित ठेवाव्या लागत होत्या.

यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुंबई येथील मेरीटाईम बोर्डाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने मांडवी खाडीतील गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाइम बोर्डामार्फत सुरु केले आहे. त्यामुळे गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला आहे.वेंगुर्लेतील किनारपट्टीवर ओखी वादळाने उद्भवलेल्या गंभीर घटनेनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मतदार संघाचे आमदार असूनही रात्रीच्या वेळी धावती भेट देऊन पाहणी केली होती. तर नवाबाग येथे त्यांनी भेट दिली नसल्याने तेथील मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली होती.

भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी ५ डिसेंबर रोजी नुकसानग्रस्त नवाबाग मच्छिमार वस्ती व मांडवी किनारपट्टीला भेट देऊन पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे माजी आमदार राजन तेली यांच्यासमवेत वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीने मांडवी खाडीतील गाळ तातडीने काढण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्यानुसार मेरीटाइम बोर्ड मुंबईच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश दिले होते. बोर्डाचे सर्व्हेयर प्रकाश चव्हाण यांनी खाडीची पाहणी करुन अहवाल सादर केला. त्यानुसार तीन लाख रूपये खर्च करुन येथील गाळ काढून खाडीचे मुख खुले करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच गाळात फसलेल्या नौका काढल्याचे कामही सुरू केले आहे.मच्छिमारांना बारा तास समद्र्रात प्रतीक्षा करावी लागत होती. हा प्रश्न गाळ काढल्याने तात्पुरता सुटला तरी कायमस्वरूपी पाणी प्रवाहित ठेवण्याबाबत उपाययोजना केल्यास खाडी सुरक्षित होऊन मच्छिमारांना नौका सुरक्षित ठेवण्याबरोबर नौकाविहाराने रोजगारही मिळेल, असे मत आधुनिक रापण संघ अध्यक्ष दादा केळुसकर यांनी व्यक्त केले.

सुमारे ३०० मीटर खाडीतील गाळ तीन फूट खोल व १० मीटर लांबीचा काढला जाणार आहे. हे काम ओखी वादळ आपत्कालीनमधील असल्याचे वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनर यांनी सांगितले.संरक्षक भाग खचलावेंगुर्ले बंदराला ओखी वादळामुळे बंदराकडील संरक्षक भाग अजस्त्र लाटाने खचला, तर मच्छिमार सुरक्षितपणे ज्या मांडवी खाडीत नौका ठेवतात, ते मुख गाळाने भरले. परिणामी खाडीतील सुमारे चाळीस नौका गाळात फसल्या होत्या. याबाबत वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले मत्सविभाग, मेरीटाइम बोर्ड यांनी पंचनामा करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन