शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मत्स्य आयुक्तांना सुनावले, मालवणात ट्रॉलर्सची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:46 IST

सिंधुदुर्ग येथील समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची जाळी जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव तत्काळ तहसीलदारांकडे सादर करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या.

ठळक मुद्दे मत्स्य आयुक्तांना सुनावले, मालवणात ट्रॉलर्सची घुसखोरी वैभव नाईक यांच्याकडून अधिकारी धारेवर

सिंधुदुर्ग : येथील समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची जाळी जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव तत्काळ तहसीलदारांकडे सादर करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या.दरम्यान, समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना तुमचा भ्रमणध्वनी सातत्याने बंद असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत आमदार नाईक यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त महाडिक यांना चांगलेच सुनावले.मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी तहसीलदार समीर घारे यांची भेट घेत पर्ससीन ट्रॉलर्सवरील कारवाईबाबत चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी येथील समुद्रात पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित ट्रॉलर्सना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारीचा परवाना असताना त्यांच्याकडे पर्ससीनची जाळी आढळून आली आहेत. त्यामुळे ही जाळी जप्त करण्याबरोबरच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याची कारवाई करा. यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करा, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. यासंदर्भात नाईक यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.चुकीची कारवाई, कार्यकर्ते बदनामदोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या रत्नागिरीतील ट्रॉलर्सवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कडक कारवाई न झाल्याने आमदार नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परराज्यातील ट्रॉलर्स पकडून देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईमुळे आमचे कार्यकर्ते बदनाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ट्रॉलरविरोधात पुन्हा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार द्यावी, अशी सूचना त्यांनी महाडिक यांना दिली.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग