शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बनावट दारूसह कार जप्त, बावळाट येथे केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:04 IST

गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वाहतूक करताना सावंतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चारचाकी गाडीसह दारू मिळून सुमारे ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देबनावट दारूसह कार जप्त, बावळाट येथे केली कारवाईपोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

सावंतवाडी : गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वाहतूक करताना सावंतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चारचाकी गाडीसह दारू मिळून सुमारे ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंतवाडी- आंबोली मार्गावर बावळाट येथे करण्यात आली.अमर अंकुश रास्ते व नितीन देविदास पाटील (दोन्ही रा. पुणे) आणि सीताराम रामू जंगले व बाबुराव भैरू पाटील (दोन्ही रा. आंबेगाव सावंतवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ते आपल्या ताब्यातील चारचाकी गाडीतून गोवा बनावटीची दारू घेऊन आंबोलीमार्गे पुणे अशी चोरटी वाहतूक करत होते.दरम्यान, सावंतवाडी-आंबोली मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना बावळट तिठा येथे त्यांच्या कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये गोवा बनावटीची दारू आढळली.

याप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील १ लाख ९३ हजार रुपयांची दारू तसेच कार मिळून एकूण सहा लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार विश्वास सावंत व सावंतवाडी वाहतूक पोलीस सखाराम भोई यांनी केली. याची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग