शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नेतर्डे येथे सव्वा कोटीचे उत्खनन, गवस यांचे उपोषण मागे: बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:02 IST

नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई केली.

ठळक मुद्दे नेतर्डे येथे सव्वा कोटीचे उत्खनन, गवस यांचे उपोषण मागे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरण

सिंधुदुर्ग : नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई केली.

दरम्यान, नेतर्डे येथे गेलेल्या चौकशी पथकाने आपला अहवाल तहसीलदार सतीश कदम यांना सादर केला आहे. यात २६७२ ब्रास बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले असून, १ कोटी ३३ लाखाचा दंड प्रस्तावित केला आहे.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना नेतर्डे येथे जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे खांडेकर यांनी नायब तहसीलदार बी. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेतर्डे येथे पाठवले होते.

या पथकाने उत्खनन झालेल्या ठिकाणची मापे घेतली व किती ब्रास उत्खनन झाले आहे याची तपासणी केली. यात २६७२ ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाल्याचे या पथकाने अहवालात नमूद केले आहे.

याचा अंदाजे दंड १ कोटी ३३ लाख रूपये होत असून, हा दंड या पथकाने उत्खनन करणाऱ्या गोव्यातील तसेच स्थानिक दोघांवर बसवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावेही या पथकाने अहवालात नमूद केली आहेत. हा अहवाल शुक्रवारी गवस यांना दाखवण्यात आला.

तो त्यांनी स्वीकारला तसेच गवस यांनी आपले काही मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ज्यांना दंड झाला आहे त्यांच्यावर सात दिवसात कारवाई केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार सतीश कदम यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे.

रात्री उशिरा चर्चेअंती तोडगा काढत गवस यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गवस यांना सरबत दिले. यावेळी नेतर्डे सरपंच प्रशांत कामत यांच्यासह रेमी आल्मेडा, नायब तहसीलदार बी. जी. पवार उपस्थित होते.तेली, साळगावकर यांनी काढली समजूतनेतर्डे येथे गेले दीड वर्ष बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. याबाबत गवस यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नसल्याने गवस यांनी तीन दिवसांपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

गवस यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी अनेकांनी शिष्टाई केली होती. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा माजी आमदार राजन तेली यांच्यासह सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी, नेतर्डे सरपंच प्रशांत कामत यांनी गवस यांची समजूत काढली तसेच त्यांना प्रशासन योग्य पध्दतीने कारवाई करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारीRajan Teliराजन तेली