शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वीज वितरणच्या अभियंत्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांचा घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:13 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत अधीक्षक अभियंता यांना घेराओ घातला. मात्र, अधीक्षक अभियंता पाटील यांनी घेराओकडे लक्ष न देता आपले भ्रमणध्वनीवरील बोलणे सुरूच ठेवले.

ठळक मुद्देवीज वितरणच्या अभियंत्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांचा घेराओप्रश्न चार दिवसांत मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत अधीक्षक अभियंता यांना घेराओ घातला. मात्र, अधीक्षक अभियंता पाटील यांनी घेराओकडे लक्ष न देता आपले भ्रमणध्वनीवरील बोलणे सुरूच ठेवले.

या कार्यकर्त्यांचे काहीही ऐकण्याची मनस्थिती त्यांनी दाखविली नाही. अखेर आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन मांडत आहोत. जर तुम्हाला लक्ष द्यायचा नसेल, तर तसेच सांगा, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी समस्या ऐकून घेऊन कार्यकर्त्यांचे समाधान केले.कुडाळ तालुक्यात विजेचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर मनसेने काही दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता पाटील यांना निवेदन सादर केले होते. हे प्रश्न चार दिवसांत मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे, दीपक गावडे, जगन्नाथ गावडे, चेतन राऊळ, प्रथमेश धुरी, अमर अणसूरकर, कुणाल किनळेकर, बाळा पावसकर, सिध्देश गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.बाव येथील मयेकर या शेतकऱ्याला मंजूर झालेल्या कृषीपंपाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याबाबत विचारणा केली असता काम आजपासूनच सुरू झाल्याचे सांगितले. तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत कुडाळसाठी वेगळे स्टेशन मागितल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेmahavitaranमहावितरण