शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : महोत्सवातून महिलांसाठी रोजगाराचे दालन  : विनायक राऊत, युवा सेनेकडून दीपावली महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:48 IST

गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दीपावली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देमहोत्सवातून महिलांसाठी रोजगाराचे दालन  : विनायक राऊतयुवा सेनेकडून दीपावली महोत्सव

सिंधुदुर्ग : गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दीपावली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी कुडाळ व शिवसेना नगरसेवक कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण व महिलांना शाश्वत रोजगार देण्यासाठी दीपावली महोत्सवाचे आयोजन कुडाळ शिवसेना शाखा येथे केले असून, ५ नोव्हेंबरपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिद्धेश कदम, दत्ता दळवी, राम रावराणे, नागेंद्र्र परब, संजय पडते, जान्हवी सावंत, राजन जाधव, अभय शिरसाट, सचिन काळप, गणेश भोगटे, श्रेया गवंडे, अमरसेन सावंत, योगेश दळवी, विक्रांत सावंत, योगेश धुरी, पंकज शिरसाट, सागर नाणोस्कर, प्रज्ञा राणे, रोहिणी पाटील, शीतल देशमुख, दीपश्री नेरुरकर, भारती मठकर, हर्षद गावडे, राजू राठोड, शिल्फा घुर्ये, छोटू पारकर, हरी खोबरेकर, संजय भोगटे, सुप्रिया मांजरेकर, संजय गवस आदी उपस्थित होते.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हा उपक्रम दरवर्षी मोठ्या स्वरुपात राबविण्यासाठी आमचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. या महोत्सवात महिला बचतगटांचे विविध स्टॉल असून, त्यामध्ये घरगुती फराळ, आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे, गावठी पोहे, रताळी, उटणे तसेच दिवाळीसाठी लागणारी कारटे व करंजीपर्यंतचे सर्व पदार्थ व वस्तू उपलब्ध आहेत. महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.युवा सेनेच्या उपक्रमांना सहकार्य : राऊतयावेळी खासदार विनायक राऊत यांनी, युवासेनेने युवक व महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. दीपावली महोत्सवाच्या ठिकाणी स्टॉल लावून महिलावर्गाला एक रोजगाराचे दालन दिले आहे. भविष्यात त्यांनी असेच चांगले उपक्रम हाती घ्यावेत. आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगत युवासेनेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग