शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : गटारे साफ न केल्यामुळे पाणी रस्त्यावर : ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:53 IST

भुईबावडा बाजारपेठेतील दत्तमंदिरानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या गटारांची साफसफाई केलेली नसल्याने आयुर्वेदिक दवाखान्यापासून गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देगटारे साफ न केल्यामुळे पाणी रस्त्यावर : ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यातभुईबावडा बाजारपेठेतील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

वैभववाडी : भुईबावडा बाजारपेठेतील दत्तमंदिरानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या गटारांची साफसफाई केलेली नसल्याने आयुर्वेदिक दवाखान्यापासून गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.खारेपाटण-गगनबावडा मार्गाच्या दुतर्फा वसलेली भुईबावडा बाजारपेठ ही दशक्रोशीतील महत्त्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी बँका, वैद्यकीय, शैक्षणिक व अन्य सुविधा असल्यामुळे दशक्रोशीतील ग्रामस्थांची या बाजारपेठेत सतत रहदारी असते. याशिवाय हा राज्य मार्ग असल्यामुळे वाहनांचीही सतत वर्दळ बऱ्यापैकी असते. त्यामुळे बाजारपेठेतील मोठमोठ्या खड्ड्यांचा सर्वांना त्रास होत आहे.गेल्या वर्षी बाजारपेठेतील खड्ड्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, ती मलमपट्टी तकलादू असल्याने पावसात पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत तर भुईबावडा ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याबाबत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भुईबावडा बाजारपेठेतील खड्डे बुजविण्याचा कधी निर्णय घेते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.चालकांची कसरतदत्त मंदिरानजीक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दुचाकीस्वार, रिक्षा व छोट्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांतून वाहन चालविताना चालकांना तसेच नागरिकांनाही जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. बाजारपेठेतून शाळकरी मुले, वयोवृद्ध व आजारी नागरिक ये-जा करीत असतात. त्यांना खड्ड्यातील चिखलाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग