शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ठिबक सिंचन योजनेच्या कर्ज व्याजदरात घट : सतीश सावंत , जिल्ह्यातील ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:52 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात २.५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. तसेच या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला कारखान्याकडून ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नठिबक सिंचन योजनेच्या कर्ज व्याजदरात घट : सतीश सावंत कारखान्याकडून शेतकऱ्यांना अनुदान

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजना  अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात २.५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. तसेच या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला कारखान्याकडून ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते. यावेळी डी.वाय. पाटील कारखान्याचे शेती अधिकारी पी. जी. पाटील, सुपरवायझर भागोजी शेळके आदी उपस्थित होते.यावेळी सतीश सावंत म्हणाले की, जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी ठिबक सिंचन योजना फायदेशीर ठरत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी.वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ठिबक सिंचन कर्ज योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ घेतल्यास उसाचे पिक वाढण्यास आणि पाण्याची बचत होण्यास आणि मनुष्य बळ वाढन्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी केले आहे.कारखान्याकडून शेतकऱ्यांना अनुदानया योजनेंतर्गत शेतकऱ्याला हेक्टरी ३० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. तसेच यासाठी कारखान्याकडून शेतकऱ्याला ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी बँक, कारखाना आणि शेतकरी यांचा त्रिपक्षीय करार होणे आवश्यक आहे. हा करार करणाऱ्या शेतकऱ्याला हेक्टरी ३० हजार रुपयांचे कर्ज ११ टक्के व्याज दराने दिले जात होते. मात्र, आता या व्याज दरात २.५० टक्के एवढी कपात करण्यात आली आहे.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतsindhudurgसिंधुदुर्ग