शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Districk Bank Election: 'दात फोडून टाकेन'; सतीश सावंत यांची भाजपाच्या महिला उमेदवाराला पोलिसांसमोर धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:13 IST

Sindhudurg Districk Bank Election voting: तहसील कार्यालयात ही बाचाबाची झाली. प्रज्ञा ढवण,संजना सावंत ढवण आणि सतीश सावंत हे आमनेसामने आले असता त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. यावेळी पोलिसांच्या समोरच तिघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली.

मुंबई/कणकवली : सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच आज जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना पोलिसांसमोरच शिवीगाळ केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. आंदोलने, अटक करण्याची मागणी यामुळे जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी सुरु आहे. आज नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर निर्णय देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आजची बाचाबाची झाल्याचे सांगितले जात आहे. 

तहसील कार्यालयात ही बाचाबाची झाली. प्रज्ञा ढवण आणि सतीश सावंत हे आमनेसामने आले असता त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. यावर सतीश सावंत यांनी जा तिकडे, असे प्रज्ञा ढवण यांना दोन तीनदा म्हटले. यामुळे ताबा सुटलेल्या ढवण यांनी सतीश सावंत यांना शिवीगाळ गेली. यावर सतीश सावंत यांनी कोणाला शीवी देतेस, असे म्हणत रागाच्या भरात शिवी घातली, तसेच दात पाडून ठेवीन अशी धमकी दिली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला आहे. या वेळी प्रज्ञा ढवण यांची मुलगी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत या देखील उपस्थित होत्या. 

सतीश सावंतांना सुरुवातीला गोट्या सावंत यांची पत्नी संजना सावंत यांनी शिवीगाळ केली. तसेच शब्द सरळ वापण्यास सतीश सावंत यांना सांगितले आहे. यानंतर ही बाचाबाची पुढे सुरु झाली.

हा प्रकार पोलिसांच्या गराड्यातच घडला आहे. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांनाही बाजुला नेत प्रकरण मिटविले आहे. कणकवली तहसील कार्यालयाबाहेर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कणकवलीत १६५ मतदार असल्याने त्या मतदारांना मतदान केंद्रांमध्ये आणण्यासाठी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. आतापर्यंत कणकवली ४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना