शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

 सिंधुदुर्ग : देवगड नगरपंचायत : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:50 IST

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर व उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. सव्वा वर्षाचा त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या पक्षाध्यक्षांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देदेवगड नगरपंचायत : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामापक्ष आदेशाप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण, नव्या निवडींकडे लक्ष

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर व उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. सव्वा वर्षाचा त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या पक्षाध्यक्षांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.

योगेश चांदोस्करदेवगड-जामसंडे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे पहिल्या अडीच वर्षांसाठी खुले आरक्षित झाले होते. या पहिल्याच सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदी महिला उमेदवार प्रियांका साळसकर यांना संधी मिळाली होती. तर उपनगराध्यक्षपदी योगेश चांदोस्कर यांना संधी मिळाली होती. या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी पक्षाच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामे दिले आहेत.आता देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, उमेश कणेरकर व संजय तारकर यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चिली जात आहेत. तर उपनगराध्यक्ष पद हे महिला नगरसेविकेला द्यायचे ठरले तर प्रणाली माने व उज्ज्वला अदम यांच्या नावांची चर्चा देवगड शहरात केली जात आहे.

स्वाभिमानचे पूर्णपणे बहुमत; नीतेश राणे निर्णय घेणारपहिल्या अडीच वर्षांसाठी सध्या खुले आरक्षण असून पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण आरक्षित झाले आहे. यामुळे आता सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपदासाठी योगेश चांदोस्कर यांच्या नावाचे पारडे जड आहे. तर उमेश कणेरकर व संजय तारकर यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे.

मात्र नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष उमेदवारांबाबत आमदार नीतेश राणे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. देवगड-जामसंडे नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे दहा नगरसेवक, एक अपक्ष, भाजपाचे चार नगरसेवक, शिवसेनेचा एक व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. या नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे पूर्णपणे बहुमत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूक