शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:07 IST

दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले. ​​​​​​​

ठळक मुद्देमांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे वनविभाग विश्रामगृह कार्यालय नूतनीकरण

दोडामार्ग : दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले.दीडशे वर्षांपूर्वी ज्यावेळी रत्नागिरी हा जिल्हा होता, त्या अगोदरपासून साटेली-भेडशी येथे वन विभागाचे विश्रामगृह कार्यरत होते. मात्र, गेली अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष होते. या वन विभागाच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज जोशी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र्र म्हापसेकर, साटेली-भेडशी सरपंच नामदेव धरणे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, दोडामार्ग वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे, बुधाजी मोरगावकर, संदीप धरणे, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.यावेळी पांढरपट्टे म्हणाले, आपणाला दोडामार्गमधील प्रत्येक गावाची माहिती आहे. येथील प्रत्येक जण आज गोवा राज्यावर अवलंबून आहे. एका बाजूला गोवा राज्य व एका बाजूला कोल्हापूर जिल्हा हे या दोडामार्गचे वैभव आहेत. दोडामार्गमधील मांगेली धबधबा हा आंबोलीप्रमाणे दोडामार्गचे भूषण आहे. येथील पर्यटन स्थळे विकसित झाली पाहिजे ही मागणी योग्य आहे. मांगेली धबधबा विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून आपण नक्की निधी देऊ, असे पांढरपट्टे यांनी सांगितले.यावेळी दोडामार्ग वन विभागाच्या मान्यवर मंडळींचे स्वागत करण्यात आले. श्रीकांत केसरकर, राजाराम टोपले, भाऊ टोपले, बंटी टोपले, गजानन देऊलकर, ग्रामस्थ, वन कर्मचारी, वनपाल उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास देसाई यांनी केले.७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबूनराजेंद्र्र म्हापसेकर यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुका निर्माण होऊन देखील येथील ७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबून आहे.रोजगार गोव्यात, खरेदी-विक्री गोव्यात, पेट्रोल-डिझेल, आरोग्य सेवा या सर्व महत्त्वाच्या गरजांसाठी गोवा येथेच धाव घ्यावी लागते. त्यामुळे येथील पर्यटन स्थळे विकसित होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग