शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प : भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:10 IST

घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

ठळक मुद्देदेवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प भूखंडासाठी १५ आॅगस्टपासून उपोषणाचा इशाराप्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड वाटप नाही

सिंधुदुर्गनगरी : घोणसरी येथील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने आपल्या निवासी भूखंडापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. हा भूखंड वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला असून बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने या प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्टपासून उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.घोणसरी देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी घोणसरी व त्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक ग्रामस्थांची घरे, जमिनी आदी मालमत्ता शासनाने प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त विस्थापित होऊन बेघर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आपल्याला निवासी भूखंड मिळावेत यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते.१ मे २०१७ आणि २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. याची दखल घेत तत्कालिन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पात्र भूखंड धारकांची यादी निश्चित करून पुनर्वसन गावठणासाठी लागणाऱ्या जमिनीची मागणी करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार जिल्हा पुनर्वसन विभागाने पुनर्वसन गावठणासाठी जमीन मागणी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही जलसंपदा विभागाने साधी दखलही घेतली नाही.यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मॅक्सी पिंटो, एकनाथ परब, गणेश परब, विजय रासम, गणेश जाधव, सिताराम परब, दीपक सावंत, साधना साळवी, विलास आयरे आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.बेघर होऊन भूखंड मिळत नसल्याची खंतविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जमीन वाटपाबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुनर्वसन विभागाकडे धूळखात पडला आहे. एकप्रकारे या विभागाने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. जलसंपदा प्रकल्पासाठी जमिनी जाऊन आणि बेघर होऊनही भूखंड मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग