शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:26 IST

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणीन्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मसुरकर यांचा इशारा

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत हे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र डी.एम.ओ.यू.टी. करण्याकरिता सावंतवाडी रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर नाहीत. परिणामी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत व या कामाचा ताण तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत असल्याचे राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक वर्षे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत डी.एम.ओ.यू.टी. करण्यासाठी नेमणूक केलेल्या पाच डॉक्टरांनी अचानकपणे गेला महिनाभर ड्युटी करण्यास नाकारले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांवर या कामाचा ताण वाढलेला आहे. रात्रपाळीसाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नितांत गरज आहे, असे मसूरकर यांनी म्हटले आहे.डॉ. दुर्भाटकर हे दरमहा अडीचशे ते तीनशे प्रसुती रुग्णालयामध्ये करत असून, सरासरी दीडशे रुग्ण हृदयरोगतज्ज्ञ अभिजीत चितारी व बालरोगतज्ज्ञ डॉ. सावंत हे सरासरी ५० रुग्णांची तपासणी दिवसासाठी करत आहेत.

गेली दहा वर्षे सावंतवाडीमध्ये जनरल सर्जन अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने छोट्यामोठ्या अपघातातील रुग्णांनाही बांबोळी-गोवा येथे जावे लागते. जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये असूनही व्हेंटिलेटर, स्कॅनिंग यंत्र नसल्याने गोवा, मुंबईचा आधार घ्यावा लागतो, हे फार दुदैर्वी आहे. याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.गेले दोन महिन्यांहून अधिक काळ निविदा नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी काम करणे सोडून दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसे न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन करून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही मसुरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग