शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, सोनुर्लीसह चार गावे दहशतीखाली, बिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 16:25 IST

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देवनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सोनुर्लीसह चार गावे दहशतीखालीबिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचेवनविभागाची उदासिनता

रामचंद्र कुडाळकर तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यांनी केले आहे.सध्या जंगलभागाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने गवे, बिबटे यांसारखे वन्य प्राणी लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. या गवे, हत्ती यांसारख्या प्राण्यांकडून हंगामी भातशेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे.

गेल्या एक-दोन वर्षांत बिबट्यासारखे हिंस्र प्राणीही लोकवस्तीत घुसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कुत्रे, वासरे, बैल आदी पाळीव प्राण्यांचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीबरोबरच आता पाळीव जनावरांच्या सुरक्षेचे आव्हानही शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

गवे, माकडे आदी प्राण्यांकडून भाजीपाला, केळी बागायती, भातशेतीचे नुकसान केले जाते. वनखात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करतात. मात्र, नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई फारच अल्प असल्याने हंगामी शेती बंद करण्याच्या मन:स्थितीत शेतकरीवर्ग दिसत आहे. सोनुर्ली, मळगाव, शेर्ले, नेमळे आदी भागातील काही शेतकऱ्यांनी तर हंगामी शेती करणे बंद केले आहे.गव्यांचा वावर जंगलभागानजीकच्या परिसरात दिवसाढवळ्याही असल्याने दुपारी, सायंकाळच्यावेळी शेतीकडे फिरणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे शेती करून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून हंगामी शेती बंद करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे.वनविभागाची उदासिनतावन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना वन खात्याकडून राबविल्याचे दिसून येत नाही. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग