शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

सिंधुदुर्ग :गव्याच्या हल्ल्यातील बस चालकाचा मृत्यू, होडावडा ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:16 IST

गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या एसटी बस चालक सतीश जनार्दन गावडे (४५) यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी होडावडा ग्रामस्थांनी मंगळवारी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराओ घालत सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे यांना जाब विचारला.

ठळक मुद्देगव्याच्या हल्ल्यातील बस चालकाचा मृत्यू, होडावडा ग्रामस्थ आक्रमक वनविभागाला घेराओ; पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची शिफारस

सिंधुदुर्ग : गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या एसटी बस चालक सतीश जनार्दन गावडे (४५) यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी होडावडा ग्रामस्थांनी मंगळवारी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराओ घालत सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे यांना जाब विचारला.आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा, मृतदेह कार्यालय परिसरात आणून ठेवणार, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

अखेर वनविभागाने पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची शिफारस करण्याचे लेखी पत्र देत तिच्या नावे बँकेत सात लाख रुपये कायम ठेव ठेवली जाईल. तसेच एक लाख रुपयांची तत्काळ शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेराओ मागे घेण्यात आला.होडावडा येथील सतीश गावडे हे वेंगुर्ले एसटी आगारात चालक म्हणून नोकरीस होते. ते शनिवारी पहाटे ६ वाजता आपल्या दुचाकीने वेंगुर्ले आगारात ड्युटीवर जात असताना सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तुळस-कुंंभारटेंब येथे गव्याच्या हल्ल्यात ते रस्त्यावर कोसळून गंभीररित्या जखमी झाले होते. ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले असता शाळकरी मुलीने पाहिल्यावर त्यांना ग्रामस्थांनी उपचाराकरिता हलविले होते.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनाम्यात घटनास्थळी गव्यांच्या पायाचे ठसे दिसून आले होते. गेले दोन दिवस गावडे यांच्यावर बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ते मृत झाले होते.यावेळी वेंगुर्लेचे माजी पंचायत समिती सभापती आबा कोंडुसकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शिवसेना संपर्कप्रमुख राजू नाईक, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, गुरूनाथ केसरकर, आत्माराम दळवी, बाळा जाधव, संतोष दळवी, शैलेश धावडे, शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख शब्बीर मणियार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.मृत सतीश गावडे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गावडे यांना आदर्श बसचालक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा या चांंगल्या कर्मचाºयाला एसटी प्रशासन मुकले. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी होडावडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.लेखी आश्वासनानंतर घेराओ मागेयावेळी झालेल्या चर्चेत सुर्वे यांनी शासनाकडून तत्काळ मदत म्हणून एक लाख रुपये देण्याबरोबर कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या नावे सात लाख रुपये कायम ठेव बँकेत ठेवण्याचे मान्य केले.

याशिवाय पतीच्या पश्चात कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचे पत्नीने एसटी महामंडळ, वनविभाग व शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केल्यास त्यासाठी आवश्यक ती सर्व शिफारस वनविभागाकडून करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी आपला घेराओ मागे घेतला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल