शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : साताऱ्याच्या तरुणावर गुन्हा, अन्य तिघांना समज देत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:31 IST

पावसाचा जोर वाढल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला भुईबावडा घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत असलेले चौघेजण आढळून आले. त्यांच्यापैकी पाटण (सातारा) येथील अमोल पांडुरंग बाकाडे (२९) याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला. तर अन्य तिघांना समज देऊन सोडण्यात आले.

ठळक मुद्दे साताऱ्याच्या तरुणावर गुन्हा, अन्य तिघांना समज देत सोडले घाटात दारू पिण्याच्या तयारीत असताना कारवाई

वैभववाडी : पावसाचा जोर वाढल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला भुईबावडा घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत असलेले चौघेजण आढळून आले. त्यांच्यापैकी पाटण (सातारा) येथील अमोल पांडुरंग बाकाडे (२९) याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला. तर अन्य तिघांना समज देऊन सोडण्यात आले.

घाटातील पावसाळी पर्यटनाला अतिउत्साही आणि मद्यपी पर्यटकांचा होणारा उपद्रव टाळण्याच्या हेतूने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी ही कारवाई केली आहे.

करुळ व भुईबावडा घाटातील धबधब्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे घाटमार्गांवर दरडी कोसळून अडथळा होत आहे. त्यामुळे दोन्ही घाटांमध्ये पोलीस पथके दररोज फेरफटका मारीत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, पोलीस नाईक सचिन सापते, राजेंद्र खेडकर, विलास राठोड, भुईबावडा घाटातून गगनबावड्याकडे जात असताना अमोल बाकाडे, संदीप अशोक चव्हाण, संतोष नामदेव मंचेकर (दोघे रा. मुंबई), संकेत संतोष शिंदे (रा. रिंगेवाडी) हे चौघेजण घाटात भुईबावडा रिंगेवाडीनजीक आढळून आले.त्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये एक दारुची बाटली आढळून आली. ते घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत होते. त्यामुळे अमोल बाकाडेवर मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तर उर्वरित तिघांना समज देऊन सोडण्यात आले. पावसाळ्यात गस्त सुरू राहणार अतिउत्साही व मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे, असे दत्तात्रय बाकारे यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग