शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सिंधुदुर्ग: बांधकामचे अधिकारीच बनले ठेकेदार, सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत सदस्य आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:26 PM

आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.याची सखोल चौकशी करा तसेच आबोली घाटात संरक्षक कठडे कोसलेत साईडपट्टी नाही एखादा पोलदपूर सारखा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्याकडून करण्यात आला.

ठळक मुद्दे बांधकामचे अधिकारीच बनले ठेकेदार, पंचायत समिती बैठकीत सदस्य आक्रमक चौकशीचा ठराव घाटात संरक्षक कठडे साईडपट्याच नाहीत                                                          

आंबोली :आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.याची सखोल चौकशी करा तसेच आबोली घाटात संरक्षक कठडे कोसलेत साईडपट्टी नाही एखादा पोलदपूर सारखा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्याकडून करण्यात आला.अधिकारीच ठेकेदार बनल्याने आबोलीची दुरव्यवस्था झाली असा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे.सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक बुधवारी सभापती रविंद्र मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गेळे येथील ग्रामपंचायत कक्षात  पार पडली.यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही.एन.नाईक, जिल्हा परीषद सदस्या रोहिणी गावडे, एस.एस.अदाण्णवर, संदेश राणे, पंचायत समिती सदस्य संदिप तळवणेकर, मोहन चव्हाण, रूपेश राउळ, पकज पेडणेकर, श्रीकृष्ण सावंत,  शितल राउळ, मेघश्याम काजरेकर, प्राजक्ता केळूस्कर, मानसी धुरी, अक्षया खडपे, मनिषा गोवेकर, गौरी पावस्कर, रेश्मा नाईक, श्रृतिका बागकर, सुनंदा राउळ, कक्ष अधीक्षक मृणाल कार्लेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदि उपस्थीत होते.

यावेळी सदस्य मोहन चव्हाण यानी आबोली कुभवडे रस्त्यावर विद्यूत वाहिन्या खाली आल्याने एसटी बस अडकून पडल्या याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थीत केला तसेच आंबोलीसाठी वायरमन ची संख्या वाढवा सध्या एका वायरमन वर काम चालू आहे.

वाढीव विज बिले कमी करण्या बाबत विज वितरण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसा ठराव ही घेण्यात आला.तर आरोग्य विभागा बाबत काही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयातच खाजगी सेवा देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात अशावर कारवाई करावी अशी मागणी सदस्य राउळ यांनी केली तर सदस्या गोवेकर यांनी वैद्यकीय अधिकारी एकाच मेडिकल मधून औषधे घेण्यास कसे सागतात त्याना काय अधिकार यांची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे.त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी आपण याबाबत चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करू असे सागिंतले.

अनधिकृत पणे गावात कोणते ही कॅम्प घेतात त्याची सर्व माहीती ग्रामपंचाय कडे असावी अन्यथा कोण ही गावात येउन काही करू शकतात तसे अनोळखी व्यक्ती एखाद्याच्या घरात घुसल्यास जबाबदार कोण असा सवाल पंचायत समिती सदस्या गोवेकर यांनी केला त्यावर सभापती मडगावकर यांनी गटविकास अधिकारी यांनी सरपंचाच्या बैठकीत याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना माहीती द्यावी व गावात एखादा कॅम्प किवा शिबीर झाले तर त्याची नोंद ग्रामपंचायत कडे असावी असे निर्बध घालावे असे सांगण्यात आले.या बैठकीत आंबोलीतील रस्ते तसेच घाटातील संरक्षक कठड्यावरून चांगलाच वादंग झाला बांधकाम चे शाखा अभियता इफ्तेकर मुल्ला यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले आंबोलीत एक ही रस्ता चांगला नाही रस्त्यावर डांबर नाही.घाटात संरक्षक कठडा नाही साईड पट्या नाही एखादी पोलादपूर सारखी घटना तर त्याला कोण जबाबदार आंबोली यावर्षो केलेले काम पुढच्या वर्षो नसते अधिकारीच ठेकेदार झाले आहेत.

रात्रीच्या वेळी वाहाने घाटातून कशी चालावयची गेळे रस्ता बघा कावळेसाद कडे जाणारे रस्ते बघा कुठच्या ही रस्त्याना साईडपट्या नाही मग पैसा कुठे खर्च केला जातो कोणाच्या घशात जातो असा सवाल ही सर्वच सदस्यानी केला बांधकामच्या कार्यपध्दतीवर सदस्यानी चांगलेच तोडसुख घेतले नंतर सभापती मडगावकर यानी त्यात मध्यस्थी करत आंबोलीतील कामाच्या चौकशीचा ठराव घेण्याचे ठरवण्यात आले या बैठकीत जिल्हापरीषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता विनायक चव्हाण यान रूपेश राउळ यानी धारेवर धरले.या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली बैठकीच्या सुरूवातीला राजमाता सत्वशिलादेवी भोसले मेजर कैस्तूभ राणे आदिना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तर मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून खासदार विनायक राउत यांनी संसदेत मराठीतून भाषण केल्याबद्दल त्याच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.बैठकीचे नियोजन गेळे सरपंच अर्जून कदम याच्यासह सदस्य ग्रामसेवक यांनी केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग