शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा मुंबईत सुटणार, येत्या शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक

By अनंत खं.जाधव | Updated: October 4, 2023 17:26 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग काँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून उद्भवलेला तिढा आता मुंबईत सुटणार असून यासाठी येत्या शनिवारी (दि.७) बैठकीचे आयोजन करण्यात ...

सावंतवाडी : सिंधुदुर्गकाँग्रेस मध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून उद्भवलेला तिढा आता मुंबईत सुटणार असून यासाठी येत्या शनिवारी (दि.७) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांची एकत्रित बैठक होणार आहे. या दोन्ही बैठका असल्याने अनेक पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष पद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.विदर्भ मराठवाड्यानंतर आता काँग्रेसने आपला मोर्चा कोकणकडे वळवला आहे. कोकणात काँग्रेसची ताकद नगण्य झाल्याने ही ताकद कशी वाढवायची यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. प्रदेश काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्याला एक-एक तास बैठकीसाठी देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलविण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात प्रभारी जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करून त्या जागी नव्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर अवघ्या २४ तासाच्या आत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठवल्यानंतर प्रदेश काँग्रेसला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. यामुळे काँग्रेसमधील स्थानिक पातळीवर अर्तंगत वाद ही उफाळून आला होता. समीर वंजारी यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित करून पुन्हा पूर्वीचे ईशाद शेख याच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशस्तरावरील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे पालकत्व कोल्हापूरचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे आहे. याबैठकीत सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेस