शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना घेराओ, लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:47 IST

कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशीत सध्या दूरसंचार सेवेचा खेळखंडोबा सुरु असून गेले तीन, चार महिने येथील समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यावर दूरसंचारचे अधिकारी खारेपाटण येथे दाखल झाले व लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेत असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्देखारेपाटण दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना घेराओलेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशीत सध्या दूरसंचार सेवेचा खेळखंडोबा सुरु असून गेले तीन, चार महिने येथील समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यावर दूरसंचारचे अधिकारी खारेपाटण येथे दाखल झाले व लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेत असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.खारेपाटण येथील दूरसंचारच्या सेवेने व्यापारी, बँका, शाळा व इतर शासकीय कार्यालयांना परिणाम भोगावा लागत असून त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. याबाबत दूरसंचारच्या अधिकऱ्यांना लेखी पत्र देऊन आंदोलनाबाबत माहिती दिली होती.या पार्श्वभूमीवर दूरसंचारच्यावतीने उपमंडल अधिकारी एस.एल.मगदूम, तसेच एस.के. पाटील, एस.आर. भिसे यांनी खारेपाटणला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेत तोडगा निघू न शकल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी वेदपाठक व एस.एल. मगदुम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा केली.

यावेळी ग्रामस्थांनी दूरसंचार सेवेचा कंटाळवाणी कारभाराचा पाढा वाचला. यावर अधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून येत्या दोन, चार दिवसांत खारेपाटण दूरसंचारची विस्कळीत असलेली सेवा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

याबाबत दूरसंचारचे सिंधुदुर्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी सिंग यानी दूरध्वनीद्वारे सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनाच्यावेळी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच ईस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, शंकर राऊत, महेंद्र गुरव, अंजली कुबल, रवीना ब्रम्हदंडे, विरेन चिके, मंगेश गुरव, प्रवीण लोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtechnologyतंत्रज्ञान