शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

सिंधुदुर्ग : कंपनीने वर्षभर दिले नाही मानधन, ग्रामपंचायतीचे काम न करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:30 PM

वर्षभर मानधन न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १७ केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. तसेच सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांनी कैफियत मांडली. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : कंपनीने वर्षभर दिले नाही मानधन, उपासमारीची वेळजिल्हा परिषदेचेही दुर्लक्ष,ग्रामपंचायत केंद्रचालकांचे सामूहिक राजीनामे

वैभववाडी : वर्षभर मानधन न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १७ केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. तसेच सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांनी कैफियत मांडली. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.राजीनामा देताना वर्षभराचे थकित मानधन एकरकमी मिळाल्याशिवाय यापुढे ग्रामपंचायतीचे कोणतेही काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी तालुका समन्वयक, सभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. एप्रिल २०१७ पासून आजमितीस केंद्रचालकांनी नियमित काम केले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून सर्व केंद्रचालकांना मानधन देण्यात आलेले नाही.याबाबत त्यांनी सी.एस.सी.एस.पी.व्ही. कंपनी आणि प्रशासनाकडे सतत मागणी केली. परंतु, कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आंबेडकर भवनात सभा घेऊन अखेर गुरुवारी सर्व केंद्रचालकांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.या सभेतच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तालुका समन्वयक पाटील यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले. त्यानंतर सर्वांनी वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे आणि गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांची भेट घेऊन कैफियत मांडली. जोपर्यंत एक वर्षाचे संपूर्ण मानधन दिले जात नाही; तोपर्यंत काम न करण्याचा निर्णय केंद्रचालकांनी घेतला आहे.

यावेळी स्नेहा वायंगणकर, दीपश्री अटेकेकर, प्रसिद्धी पवार, श्रद्धा सांवत, रुपाली रावराणे, उदय फोंडके, जयराज हरयाण, रुपेश कांबळे, महेश दळवी, तुषार हडशी, हेमंत साळुंखे, विधी नारकर, अक्षय कांबळे, प्रशांत पांचाळ, महेश पाटील, राजेंद्र कदम, विशाल जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे थकित मानधनासाठी सामूहिक राजीनामे सुपुर्द केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpanchayat samitiपंचायत समिती