शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवली नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत, नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:31 IST

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अभय राणे व अजित राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी राजश्री धुमाळे यांच्यासह ७ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या ९ झाली आहे.

ठळक मुद्देकणकवली नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत, नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे ९ अर्ज मागे; ६ एप्रिल रोजी मतदान

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अभय राणे व अजित राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी राजश्री धुमाळे यांच्यासह ७ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या ९ झाली आहे.उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना- भाजप युतीकडून संदेश पारकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून समीर नलावडे, काँग्रेसच्यावतीने विलास कोरगावकर तर स्वतंत्रपणे लढणाऱ्या कणकवली विकास आघाडीच्यावतीने राकेश राणे यांच्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे.तर नगरसेवक पदासाठी ५ ठिकाणी चौरंगी व ७ ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. २ ठिकाणी पंचरंगी तसेच २ ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १० मध्ये तीन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

मात्र, या प्रभागातील भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शीतल रामदास मांजरेकर व काँग्रेसच्यावतीने अर्ज दाखल केलेल्या स्वाती अजित काणेकर यांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने अवैध ठरविण्यात आले होते. त्या दोघांनी न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील दाखल केले आहे. त्यामुळे या प्रभाग १० चा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत लढती निश्चित झाल्याने आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे.

नगरसेवक पदासाठी ५५ उमेदवार रिंगणातकणकवली नगरपंचायत निवडणुकीअंतर्गत नगरसेवक पदासाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग १० मधील ३ अर्ज वैध ठरले असले तरी २ अवैध ठरलेल्या अर्जांच्या अपिलावर सुनावणी होऊन निर्णय झाल्यानंतर या प्रभागातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका