शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पिस्तूल रोखत तरुणावर चाकूहल्ला, वायरी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:52 IST

जमीन खरेदीतील धमकीच्या वादातून मालवण तालुक्यातील वायरी गावकरवाडा येथील दिनेश दत्ताराम साळकर (३५, रा. हडी-साळकरवाडी) या तरुणाला दांडी येथील राजेश खडपे, शुभम संतोष जुवाटकर व अन्य एका संशयिताने पिस्तूल रोखत चाकूहल्ला केला.

ठळक मुद्देपिस्तूल रोखत तरुणावर चाकूहल्ला, वायरी येथील प्रकार जमीन विक्रीतील पैशांवरून झाला वाद

सिंधुदुर्ग : जमीन खरेदीतील धमकीच्या वादातून मालवण तालुक्यातील वायरी गावकरवाडा येथील दिनेश दत्ताराम साळकर (३५, रा. हडी-साळकरवाडी) या तरुणाला दांडी येथील राजेश खडपे, शुभम संतोष जुवाटकर व अन्य एका संशयिताने पिस्तूल रोखत चाकूहल्ला केला. याप्रकरणी साळकर याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. हा प्रकार वायरी गावकरवाडा येथील हडकर बियरशॉपी येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला.वायरी गावकरवाडा येथे दिनेश साळकर हा तरुण राहतो. त्याची कोल्हापूर जिल्ह्यातील वतार-हातकणंगले या गावी स्वमालकीची एक एकर जमीन आहे. ती जमीन तानाजी भंडारी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये विकत घेतली. या जमीन व्यवहारातील उर्वरित दोन लाख रक्कम मिळविण्यासाठी साळकर याने महिन्याभरापूर्वी राजेश खडपे याला वसुली करण्यास सांगितले. राजेश याने शुभम जुवाटकर याच्यावर जबाबदारी दिली होती.दिनेश साळकर याला राजेशने रविवारी ८.३० वाजता फोन करून मालवण तालुक्यातील वायरी येथील हडकर बियर शॉपीत बोलावून घेतले. त्यानंतर राजेश, शुभम व राजेशचा भाऊ मद्य प्राशन करीत बसले.

त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता शुभम याने आपल्याकडील पिस्तूल दिनेश याच्या डोक्यावर रोखून धरले व जमीन व्यवहारातील धमकीच्या बदल्यातील पैसे दे, नाहीतर ठार मारून टाकेन अशी धमकी देत डाव्या हाताने तेथीलच बियरची बाटली फोडून कानशिलात लगावत दुखापत केली. त्यानंतर दिनेश हा स्वत:ला वाचविण्यासाठी पळत असताना शुभम याने चाकूने हल्ला करीत उजव्या खांद्याला दुखापत केल्याचे साळकर याने तक्रारीत म्हटले आहे.तिघांवर गुन्हा दाखलसाळकर याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी संशयित राजेश खडपे, शुभम जुवाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. तर अन्य एका संशयिताला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश सोनावणे, संतोष गलोले हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग