शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : केंद्र ब्रेक वॉटर हार्बर योजना राबविणार : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:20 IST

कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्र ब्रेक वॉटर हार्बर योजना राबविणार : राजन तेलीवेंगुर्ले समुद्रातील गाळ काढणार

सावंतवाडी : कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गमधील तीन समुद्र किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

वेंगुर्ले, निवती व वेळागर या तीन समुद्र किनाऱ्यांवरचा गाळ काढण्यात येणार असून याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडीत  दिली.राजन तेली यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर उपस्थित होते. तेली म्हणाले, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे हे स्वच्छ आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येत असतात. त्यातून या समुद्र किनाऱ्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या किनाऱ्यांवर ब्रेक वॉटर हार्बर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले, निवती व वेळागर या तीन समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात या समुद्र किनाऱ्यांवरील गाळ काढण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मच्छिमारांना होणार आहे.समुद्रातील गाळ काढल्याने देवगड समुद्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या बोटी ठेवल्या जातात, त्या या समुद्रातही ठेवण्यात येऊ शकतात. अनेक बोटींना थांबा मिळू शकतो. मच्छिमारांच्या बोटीही आतमध्ये जाऊ शकतात. तसेच गाळ काढल्यानंतर लाटा थांबविण्यातही यश येऊ शकते. यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, केंद्र सरकार या माध्यमातून देशात पाच हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.७२० किलोमीटरचा समुद्र लाभल्याने याचा मोठा फायदा कोकणला होणार आहे आणि येथील पर्यटन वाढण्यासही मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची घोषणा केली असली तरी, याबाबतची बैठक महाराष्ट्राचे अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहितीही तेली यांनी दिली आहे. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली