शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तळगावात स्वाभिमानचे फलक फाडले, अज्ञाताचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:07 IST

मालवण तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे.

ठळक मुद्देतळगावात स्वाभिमानचे फलक फाडले, अज्ञाताचे कृत्य खासदारांच्या गावात राणेंनी पूल मंजूर केल्याचा दावा

मालवण : तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल स्वाभिमानचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे.

याबाबत ग्रामस्थांसह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या गावात राणे यांनी पूल मंजूर केल्याने सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप केला.दरम्यान, तळगाव हा खासदार विनायक राऊत यांचा गाव असून आमदार वैभव नाईक यांनी हा गाव दत्तक घेतला आहे. मात्र, सत्ताधारी गावात विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे काही समाजकंठकांकडून समाज हिताच्या आड येत बॅनर फाडल्याची विकृती समोर आली आहे. अशा वृत्तीचा तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी निषेध केला.|तळगाव येथे शुक्रवारी तालुकाध्यक्ष मंदार केणी, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, नगरसेवक यतीन खोत यांनी तळगाव गावास भेट देऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.

तळगाव येथे स्वाभिमान कार्यकर्त्यांनी लावलेले आभाराचे फलक अज्ञातांनी फाडले.

यावेळी ग्रामस्थ नरेंद्र पावसकर, महेश परब, संदीप दळवी, जगदीश चव्हाण, सुभाष सावंत, अर्जुन माळगावकर, सागर गावडे, नामदेव दळवी, दत्तू सावंत, जनार्दन तळगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.वराड व तळगाव या मार्गावर कर्ली खाडी असल्याने या मार्गावर पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांची होती. सद्यस्थितीत या मार्गावर लोखंडी साकव असल्याने कोणतेही वाहन यावरून जात नव्हते. शिवाय गावातील ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती.

आजारी माणसांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे पूल उभारण्याबाबत पाठपुरावा सुरु केला. राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्याकडे नवीन पुलासाठी निधीची मागणी केली होती.नव्या प्रशस्त पुलासाठी नाबार्ड योजनेतून १ कोटी वीस लाख मंजूर करण्यात आले आहेत. या पुलामुळे वराड तळगाव या गावांना जोडणारा आठ ते दहा किमी लागणारा फेरा वाचणार आहे, असे संतोष साटविलकर यांनी सांगितले.

मात्र आपल्या गावासाठी नवा पूल प्रस्तावित झाल्याने स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या ठिकाणी खासदार राणे यांच्या आभाराचे फलक लावले. त्यानंतर काही समाजकंटकांकडून हे फलक फाडण्यात आले.तळगाव गाव खासदार राऊत यांचा असल्याने फलक फाडल्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण ढवळू शकते. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आली नसली तरी स्वाभिमानकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.गावात सुडाचे राजकारण : मंदार केणीखासदार विनायक राऊत आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विकास कामात अपयशी ठरले आहेत. आपल्या गावातील पूल उभारणी करणेही त्यांना शक्य नसल्याने ग्रामस्थांनी नारायण राणे यांना हाक दिली. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पूल उभारणीसाठी निधी मंजूर करून घेतला. त्याप्रमाणे गावात फलक लावण्यात आले. फलक फाडण्याचे केलेले कृत्य पाहता गावात सुडाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे