शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी : परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:05 IST

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी उपजिल्हा रुग्णालयाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.मनसे कार्यकर्त्यांसह उपरकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि. एम. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांची सेवा सन २०१२ मध्ये बंद झाली. त्यानंतर या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षात येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर देण्यात आलेला नाही. गेले तीन वर्षे डॉ. महेंद्र्र आचरेकर यांनी एक हाती उपजिल्हा रुग्णालय सांभाळले होते. पण त्यांची इच्छा असतानाही त्यांना सेवेची मुदत वाढवून देण्यात आलेली नाही.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फक्त ४ डॉक्टर्स आहेत. त्यामुळे सध्या तापसरीसह अपघात व इतर आजारांचे रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. तालुक्यातील रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ, सर्जन आदी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे डॉक्टर देखील रुग्णालयात फिरकत नाहीत. त्यामुळे येथे कोणी वालीच राहिलेले नाही.

राज्य शासनाने आणि आमदार , खासदार आणि पालकमंत्र्यानीही कणकवली उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडले आहे. तिन वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात खासदार विनायक राऊत यांनी अपंगाचा मेळावा घेतला. यातील पात्र रुग्णांसाठी ४० व्हीलचेअर आणि काठया असे साहित्य आले. मात्र हे साहित्य गेली तीन वर्षे रुग्णालयात धूळ खात आहे. त्यांचे वाटप करण्यास उपजिल्हा रुग्णालय प्रशासन आणि खासदारानाही वेळ नाही.

या रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या दोन वर्षात हाफकिन संस्थेकडून औषधांची खरेदी झालेली नाही. याबाबत आरोग्य संचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनीहि आज आमच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे असे सांगून वेळ मारून नेली.उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि फ्रॅक्चरसाठी आलेले रुग्ण परस्पर खासगी रुग्णालयात पाठविले जातात. वस्तुत: उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत नसतील तर त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. परंतु, साटेलोटे प्रकार असल्याने हे रुग्ण ठराविक खासगी रुग्णालयात पाठविले जातात. असा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर