शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सिंधुदुर्ग : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:11 IST

बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छादवनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.सटमटवाडी येथे मेहनतीने शेतकऱ्यांनी बागायती फुलविल्या आहेत. याठिकाणी काजू, सुपारी, नारळ बागायती मोठ्या प्रमाणात असून शेतकरी बागायतीमध्ये आंतरपीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतात. तसेच उन्हाळी भाजीपाला, नाचणी, मिरची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येते.

शेतीबरोबरच काजू, सुपारीची कलमेदेखील गव्यांकडून मोडण्यात येत असल्याने शेतकरी गव्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दिवसादेखील बागायतीमध्ये दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जाणेही जिकीरीचे ठरत आहे.गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत स्थानिक शेतकरी बाबी वसकर आणि सुभाष परब यांनी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांची भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांत गव्यांनी शेती बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याने आम्हांला नुुकसानभरपाई नको, मात्र शेतकऱ्यांच्या बागायतीला संरक्षक कुंपण करुन द्या अशी मागणी करण्यात आली.

वनपाल शिरगावकर यांनी आपल्या भावना वरिष्ठांना कळवू, गव्यांना बागायतीतून हुसकावून लावण्यासाठी वनखात्यामार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी वनकर्मचारी पाठविण्याचे आश्वासन शिरगावकर यांनी शेतकऱ्यांना दिले.गतवर्षी सटमटवाडी परिसरात माकडतापाची साथ असल्याने शेतकऱ्यांनी शेती बागायतीकडे दुर्लक्ष केले होते. शेतीतून मिळणाºया वर्षभराच्या कमाईवर पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी शेती बागायतीकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर्षी गव्यांनी या परिसरात उच्छाद मांडल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आले आहेत.

बांदा-सटमटवाडी येथे गव्यांनी काजू कलमांचे मोठे नुकसान केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग