शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, कित्येक पुरोहितांचे अनंत चतुर्थीपर्यंतचे बुकिंग श्री गणेश चतुर्थीपूर्वीच करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनंतचतुर्थीपर्यंत घरोघरी धार्मिक कार्यक्रम

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना तसेच प्रतिष्ठापणा केल्यानंतर होणाऱ्या पूजा, गणेश याग, गण होम असे विविध धार्मिक विधी केले जातात. त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा, ब्राह्मण भोजन असेही धार्मिक कार्यक्रम घरोघरी केले जातात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, कित्येक पुरोहितांचे अनंत चतुर्थीपर्यंतचे बुकिंग श्री गणेश चतुर्थीपूर्वीच करण्यात आले आहे.सध्या पौरोहित्य करत असणाऱ्यांपैकी बहुतेकांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांची पुढची पिढी या क्षेत्रात काम करण्यास अनुत्सुक असल्याचे सांगितले जाते. सिंधुदुर्गात घरगुती गणपतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे धार्मिक विधी करताना गणेशोत्सव काळात पुरोहितांची अनेकवेळा कमतरता भासत असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी तर पहाटे लवकर पुजेला सुरुवात करूनसुध्दा अनेक पुरोहितांना रात्रीचे आठ वाजत असतात. सर्वात आधी आपल्या घरी पुरोहित यावेत यासाठी गणेशभक्तांची धावपळ चाललेली असते.गणेशोत्सव काळात पुरोहितांच्या कामाचा खूप व्याप असतो. या काळात त्यांना पूजेच्या कामातून उसंत मिळणेही कठीण असते, त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचे अगोदरच नियोजन केले जाते. त्यामुळे त्यांचा ताण काहीसा कमी होतो.या पार्श्वभूमीवर काही पुरोहितांनी सांगितले की, पौरोहित्य शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना वेदपाठ शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे आगामी काळात निश्चितच पुरोहितांच्या संख्येत वाढ होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या ५ तालुक्यांमध्ये बहुतांश घरांमध्ये पुरोहितांकडून गणेशाची पूजा केली जाते. कणकवली, देवगड व वैभववाडी या ३ तालुक्यांमध्ये काही ठराविक घरांमध्ये पुरोहितांकडून पूजा करून घेतली जाते. परंतु पुरोहितांची संख्या कमी असल्यामुळे सर्व गणपतींची पूजा त्यांच्याकडून करून घेणे शक्य नसल्यामुळे अनेक गणेशभक्त स्वत:च गणपतीची पूजा करतात.

आज समाजात मुळातच पुरोहितांची संख्या कमी आहे. सर्वांचे गणपती एकाच दिवशी येत असल्यामुळे एका पुरोहिताला सर्व गणपतींची पूजा करणे कठीण आहे. त्यामुळे जे स्वत:च गणपती पूजतात ते एका दृष्टीने पुरोहितांच्या दृष्टीने चांगले आहे.अनेक गणेशभक्त करतात स्वत:च पूजापुरोहितांकडूनच गणपतीची पूजा करून घेण्याची काही गणेशभक्तांची मानसिकता आहे. तर काही गणेशभक्त स्वत:च गणपतीचे पूजन करीत आहेत. मात्र त्यांच्या घटत्या संख्येचा विचार करता पुरोहितांकडून गणपतीची पूजा करून घेणे ही प्रथा आता कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग