शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भालचंद्र दळवी यांचे पुन्हा उपोषण, जानवली रामेश्वरनगर येथील अनधिकृत बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 16:05 IST

कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी  मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भालचंद्र दळवी यांनी उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देभालचंद्र दळवी यांचे पुन्हा उपोषण, जानवली रामेश्वरनगर येथील अनधिकृत बांधकामचौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल मान्य नसल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बोलविले नाही. त्यामुळे या चौकशीला काही अर्थ नाही.

चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगत अनधिकृत बांधकामावर तसेच हे अनधिकृत बांधकाम करण्यास मदत करणाऱ्या मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कणकवलीचे शिवसेना उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी यांनी पुन्हा जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले आहे.जानवली रामेश्वरनगर येथे तेथील जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आहे. त्याचप्रमाणे इमारत बांधकाम सुरू असलेली जमीन संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी तत्कालीन मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून फेरफार करून हडप केली आहे.

या इमारतीचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. असे असतानाही जानवली ग्रामसेवकाला हाताशी धरून इमारतीचे असेसमेंट करून घेतले आहे. त्यामुळे जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेले बांधकाम हे अनधिकृत आहे.

याशिवाय अनधिकृत जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी काही व्यक्तींकडून कराराने लाखो रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे रेरा कायद्याचा भंग करून शासनाचा महसूलही बुडविला आहे असा आरोपही दळवी यांनी केला आहे.कारवाई करण्यात यावीयाबाबत आपण कणकवली गटविकास अधिकाऱ्याकडे ११ जून २०१८ रोजी तक्रार दिली होती. मात्र, राजकीय दबाव असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही दळवी यांनी केला आहे. तक्रार देऊनही अद्याप काही न झाल्याने अनधिकृत इमारतीसह संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग