शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: बांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिक : के मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:25 IST

कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देबांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिक : के मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरीत बांबू लागवड, उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी : कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, कमलाकर रणदिवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बांबू लागवडीविषयी मार्गदर्शक मिलिंद पाटील आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.२0१८-१९ मध्ये बांबू लागवड अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, या अभियानासाठी ग्राम पातळीवरचे नियोजन महत्वाचे आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठीचा परिपूर्ण नियोजन अराखडा तयार करावा. बांबूच्या जाती त्यांचे उत्पादन आणि त्यांचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याचे नियोजन तयार करावे. त्यामुळे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करता येईल.

१0 डिसेंबर पर्यंत तालुका स्तरावर बांबू लागवडी विषयी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. ४ लाख बांबू लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप यांनी या अभियानाची थोडक्यात महिती दिली. तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील बांबूची लागवड, त्याचे अर्थकारण व फायदेही सांगितले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी प्रस्तावनेत बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेचा उद्देश व या अभियानाची माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगून या अभियानासाठी शुभच्छा दिल्या. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग