शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, कुडाळात मोर्चा, घोषणांनी शहर दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:41 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा या व इतर मागण्यांसाठी कुडाळ तालुका मागासवर्गीय अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने कुडाळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, कुडाळात मोर्चा : घोषणांनी शहर दणाणलेमागासवर्गीय कृती समितीचे आयोजन

सिंधुदुर्ग : अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा या व इतर मागण्यांसाठी कुडाळ तालुका मागासवर्गीय अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने कुडाळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी कुडाळ शहर परिसर दणाणून गेला. सरकारने मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष सत्यवान साठे यांनी यावेळी दिला.अध्यक्ष सत्यवान साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. तेथून हा मोर्चा गांधी चौक, कुडाळ जिजामाता चौक, पोस्ट कार्यालय, संत राऊळ महाराज कॉलेज चौक यामार्गे कुडाळ प्रांत कार्यालयावर धडकला.मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर समितीचे अध्यक्ष सत्यवान साठे, उपाध्यक्ष विष्णू तेंडोलकर, सचिव चंद्रकांत वालावलकर, बापू कुडाळकर, अमोल पावसकर, दिनेश जाधव, वामन बांबर्डेकर, स्मिता नाईक, आनंद नेरूरकर, विष्णू जाधव, प्रतिभा सावळे, लक्ष्मण पवार, सत्यवान तेंडुलकर, पर्णवी जाधव, दीपा पिंगुळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले व आपल्या मागण्या शासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली....या आहेत मागण्यानिवेदनात समितीच्यावतीने नमूद करण्यात आले आहे की, २० मार्च रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने करू नये. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता हा कायदा अधिक कडक करावा. जेणेकरून दलितांवरील अन्याय, अत्याचार कमी होईल.

कोरेगाव-भीमा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, खेड जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करा, कोरेगाव-भीमा दंगलीदरम्यान बहुजन समाजातील बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, शैक्षणिक शिष्यवृत्तीत कपात करण्यात येऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा