शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : प्रकल्पस्थळी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:59 IST

प्रकल्पग्रस्तांनी अरुणा प्रकल्पस्थळी गुरांसह पाळीव प्राण्यांना घेऊन आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी नोटीस बजावण्यासाठी आखवणेत जाणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात पाय ठेऊ न देण्याची भूमिका अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी घेतली.

ठळक मुद्देबळजबरीने नोटीस बजावण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला विरोधअधिकाऱ्यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्धार

वैभववाडी : प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे कानाडोळा करीत १२/२ ची नोटीस बळजबरीने अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या माथी मारण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाकडून सुरु झाला आहे. याचा निषेध म्हणून प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी सकाळपासून अरुणा प्रकल्पस्थळी गुरांसह पाळीव प्राण्यांना घेऊन आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी नोटीस बजावण्यासाठी आखवणेत जाणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात पाय ठेऊ न देण्याची भूमिका अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी घेतली.महसूलतर्फे प्रकल्पग्रस्तांना अशी नोटीस बजावण्याचा यापूर्वी दोनदा झालेला प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत संबंधितांशी चर्चा करण्याचे सौजन्य दाखवले नसल्याचा आरोप अरुणा कृती समिती आखवणे-भोम यांनी केला आहे.दुसऱ्यावेळी नोटीस बजावण्यास गेलेल्या अधिकाऱ्याना गेल्याच महिन्यात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अडवून माघारी पाठविले होते. त्यानंतर आता मंगळवारी तिसऱ्यांदा नोटीस बजावण्याची तारीख प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आखवणे, भोम व नागपवाडी या तीन महसुली गावांचा समावेश आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम निवाड्यामध्ये अनेक चुका असून त्या दुरुस्त कराव्यात. नोटीस वाटप करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन सविस्तर माहिती द्यावी. अशी भूमिका अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीने घेतली आहे.

मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे कानाडोळा करीत प्रशासन मोबदला वाटपाची नोटीस प्रकल्पग्रस्तांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. या आंदोलनात समिती अध्यक्ष रंगानाथ नागप, सचिव शिवाजी बांद्रे, वसंत नागप, शांतीनाथ गुरव, एकनाथ मोरे, विजय भालेकर, सुरेश नागप, विलास कदम, यांच्यासह सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्त आंदोलनात सहभागी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत प्रकल्पग्रस्त अरुणा प्रकल्पस्थळी ठाण मांडून होते. त्यामुळे मंगळवारी नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे.बळाचा वापर हाणून पाडूप्रकल्पग्रस्तांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप निर्माण झाला असल्याने सोमवारी सकाळपासूनच अबालवृद्धांसह, अगदी गुराढोरांना सोबत घेऊन प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी आंदोलनास सुरुवात केली आहे. मंगळवारी नोटीस वाटप करण्यास येणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावात पाय ठेऊ द्यायचा नाही. बळाचा वापर करुन नोटीस वाटण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू. त्यावेळी अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघर्ष कृती समितीने दिला आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग