शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आनंदवाडी प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ होणार : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:55 IST

देवगडचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या हरितक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसायमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देआनंदवाडी प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ होणार : विनायक राऊतमत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या बैठकीत कामाला मंजुरी

देवगड : देवगडचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या हरितक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसायमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मे महिन्यात या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.आनंदवाडी प्रकल्पाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली असून या प्रकल्पाला केंद्रशासनाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. केंद्रशासनाच्या सागरमाला योजनेतून २५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून मार्च अखेरीस सदर निधी राज्यशासनाकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहिकरीता मत्स्यव्यवसाय आयुक्त विधाते यांनी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाचे सर्व तांत्रिक बाबीही एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये प्रकल्पाच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. प्रथम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे ५०० मीटर सरकविण्यात आला. मात्र त्यानंतर अनेक कारणामुळे प्रकल्पाचे काम रखडले होते.या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून ती ८८.४ कोटींपर्यंत पोहोचली. सुरूवातील केंद्र्रशासनाचा ७५ टक्के निधी व राज्यशासनाचा २५ टक्के निधी या प्रकल्पासाठी देण्याचे ठरले. मात्र, त्यानंतर यामध्ये बदल होऊन केंद्रशासन २५ कोटी रुपये व राज्यशासनाने उर्वरीत रक्कम ६३.४ कोटी रुपये द्यावेत असे ठरले. त्यानुसार राज्यशासनाने ६३.४ कोटी रुपये मंजूर करून मागील बजेटमध्ये १० कोटी रूपयांची तरतुदही करण्यात आली होती. मात्र, केंद्र्रशासनाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत देवगड येथील आनंदवाडी बंदर प्रकल्प होता.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग