शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:15 IST

sindhudurg News- सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.

ठळक मुद्देरोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद संपादित केलेल्या जमिनी पडून; आरोग्याबाबतही तीच स्थिती

अनंत जाधवसावंतवाडी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसी, सावंतवाडी तालुक्यात उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्प, आरोंदा किरणपाणी पोर्ट, वाफोली चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, टाटा मेटॅलिक प्रकल्प बहुचर्चित राहिले. बेकारांना नोकऱ्या देणार असे स्वप्न रंगविले. पण प्रत्यक्षात स्वप्नभंग झाला.

उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन सातार्डा, सातोसे, मडुरा येथे संपादित केली आहे. तसेच टाटा मेटॅलिक प्रकल्प रेडी येथे सुरू होता. तो बंद झाल्याने तेथेही जमीन पडून आहे. माजी अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांनी रेडी येथे इस्पात कंपनीचा प्रकल्प सुरू केला होता. तो प्रकल्प बंद झाल्यानंतर तेथे टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे तोही प्रकल्प बंद झाला. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी बेरोजगार व टाटा मेटॅलिकमध्ये नोकरी असणाऱ्या लोकांनी सतत प्रयत्न केले. मात्र, प्रकल्प होऊ शकला नाही.रेडी समुद्राच्या जवळ टाटा मेटॅलिक प्रकल्प होता. गोवा, तेरेखोल किल्ला जवळ असणाऱ्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होत होता. तसेच रेडी, शिरोडा, आरोंदा भागांमध्ये अप्रत्यक्ष व्यवसाय व रोजगाराची दालने खुली झाली होती. मात्र, बंद झालेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आश्वासनापलीकडे फक्त राजकीय चर्चा झाली.

रेडी पोर्ट या सुमारे पाच हजार कोटींच्या ह्यबांधा वापरा आणि हस्तांतरित कराह्ण प्रकल्पाची घोषणा झाली. रेडी पोर्ट खासगी विकासकाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर या विकासकांनी याठिकाणी काय विकास केला व किती लोकांना रोजगार दिला, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. प्रत्यक्षात रेडी पोर्ट विकसित झाले नाही. मात्र, शासनाचे मेरिटाईम बोर्ड रेडी पोर्ट खनिज वाहतूक करण्यासाठी चालवित होते. ते खासगी विकासकाकडे गेल्याने निर्यात फायदा झाला.रोजगार निर्माण करणारे प्रकल्पच उभे राहिले नाहीतबांदा, वाफोली याठिकाणी खासगी कंपनीच्या माध्यमातून चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प उभे राहणार होते. मात्र, तेही उभे राहू शकले नाहीत. या प्रकल्पांच्या घोषणा आणि चर्चा झाल्या. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यांमधील नमूद केलेले प्रकल्प उभे राहिले असते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. मात्र, घोषणाबाजी करून जमिनी संपादित केल्या. प्रत्यक्षात रोजगार निर्माण करणारे प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे तरुणवर्गाला गोवा, मुंबई व अन्य ठिकाणी जावे लागत आहे.जनतेच्या पदरी उपेक्षाचसिंधुदुर्गाने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अनेक नेते दिले. मात्र, येथील जनतेच्या पदरात उपेक्षाच आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दीपक केसरकर, प्रवीण भोसले असे एकापेक्षा एक नेते सध्या कार्यरत आहेत.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा