शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग : नेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 3:48 PM

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करेपर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची गुऱ्हाळे सुरूच होती. एकीकडे शत-प्रतिशत भाजपाचा नारा देणारी नेतेमंडळी शिवसेनेसोबत कशी काय गेली?

ठळक मुद्देनेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले सर्वसामान्यांच्या चर्चेने निवडणूक वातावरण तापतेय....

महेश सरनाईक

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करेपर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची गुऱ्हाळे सुरूच होती. एकीकडे शत-प्रतिशत भाजपाचा नारा देणारी नेतेमंडळी शिवसेनेसोबत कशी काय गेली?

दुसरीकडे भाजप हाच आपला एक नंबरचा शत्रू पक्ष असल्याची वल्गना करणारी शिवसेना भाजपच्या दावणीला कशी काय बांधली गेली? अशी राजकीय चर्चा आता सर्वसामान्य शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे. त्यामुळे नेत्यांचे जरी सत्ता केंद्रस्थानी मानून मनोमिलन झाले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी पसरलेली जाणवत आहे.कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला चौथी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन ते तीन महिने अगोदरपासून कणकवलीत निवडणूकपूर्व वातावरण तापायला सुरुवात झाली होती. यात स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि भाजप या तिघांनीही जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभही केला होता.

वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय असो त्या स्थितीत या तिन्ही पक्षांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढविणार असा पवित्रा घेऊनच आखणी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे यावर्षीची निवडणूक अतिशय रोमहर्षक होणार असल्याची चिन्हे अगोदरपासूनच जाणवत होती.

मात्र आता प्रत्यक्षात निवडणूक लढविण्याची पाळी आली तेव्हा शिवसेना आणि भाजपने एकत्रित येत युतीचे रणशिंग फुंकले आहे. युती करावी असे स्थानिक नेतृत्वाला का वाटले? कारण त्यांना स्वतंत्ररित्या निवडणूक लढविल्यास आपल्या मतांची विभागणी होईल आणि आपला प्रतिस्पर्धी असणाऱ्या स्वाभिमानला आपोआप संधी मिळेल, असे वाटत होते.अनेकांच्या मनसुब्यावर पाणीकेंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना विस्तारण्याची संधी म्हणजे निवडणूक. पाच वर्षांनी एकदा संधी मिळणार म्हणून कणकवली शहरातील अनेक शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते आनंदी होते. त्यातच शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्यासाठीच मोर्चेबांधणी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदेश बांदेकर यांचा प्रसिद्ध होम मिनिस्टर कार्यक्रमही कणकवलीत घेण्यात आला.

या कार्यक्रमालाही महिलांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर उतरेल, असे कार्यकर्त्यांना मनोमन वाटत होते. त्यामुळे इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर आखणी करायलाही सुरुवात केली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संधीची वाट पहात बसलेल्या काही जणांना तर मग आयत्यावेळी काँग्रेसमधून किंवा गावविकास आघाडीमधून निवडणूक रिंगणात उतरण्याची पाळी आली.राणेंनी नेहमीच दिली कार्यकर्त्यांना संधीनिवडणूक म्हटली की हार, जीत ही आहेच. परंतु कार्यकर्ते निर्माण करायचे असल्यास किंवा त्यांना स्वतंत्ररित्या उभे करायचे असल्यास त्यांना या ना त्या कारणाने संधी देण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात सिंधुदुर्गात अनेक कार्यकर्ते घडविले. अनेकांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळेच कार्यकर्त्यांची मोठी फळी ते निर्माण करू शकले.

काही ठराविक नेतेमंडळी वगळता जर चक्राकार पद्धतीने प्रत्येकाला संधी मिळाली तर त्या संधीतून तो आपले कर्तृत्व दाखवू शकेल अशा भावनेतून म्हणा किंवा जबाबदारीची जाणीव करून देत राणे यांनी प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना अगदी ताकदीनीशी संधी दिल्यामुळे कार्यकर्तेही मन लावून काम करू लागले. त्याचा फायदा निवडणुकीत विजय मिळविणे त्यांना सोपे गेले. त्यातूनच गेल्या २५ वर्षांत राणे आणि विजय असे समीकरणही बनले होते.

मागील काही निवडणुकांमध्ये त्यात खंडही पडला. नारायण राणे किंवा त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा पराभवही झाला. मात्र, असे असतानाही राणे यांनी खचून न जाता कार्यकर्त्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांना प्रत्येकवेळी संधी देण्याची त्यांची राजकीय खेळी कायम ठेवली. कणकवलीतदेखील यावेळी राणे यांनी संजय कामतेकर, संजय मालंडकर यांसारख्या जुन्या सहकाºयांना संधी दिली आहे. त्यामुळे त्याबाबतचा एक वेगळा मेसेज सर्वांसमोरच गेला.

मैदानात उतरण्यापूर्वीच आत्मविश्वास गमावलाशिवसेना आणि भाजपने स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात उतरून जनमत आजमावणे गरजेचे होते. त्यातून लोकांनी कौल त्यांच्या बाजूने दिला असता तर त्यानंतर युती करणे क्रमप्राप्त झाले असते. तसे पाहिल्यास विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप स्वंतत्ररित्या लढले होते आणि मग युती करून राज्य सरकारमध्ये ते सामील झाले आहेत. परंतु युती करून विधानसभेच्यावेळी ते लढले असते तर बहुतांशी कार्यकर्ते नाराज झाले असते. त्यांना निवडणूक लढविण्याची संधीही मिळाली नसती. तसाच काहीसा प्रकार आता कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत झालेला आढळत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच या दोन्ही पक्षांनी आपला आत्मविश्वास गमावल्याचे जाणवले. दोन्ही पक्षांना आणि नेतृत्वाला युती व्हावी, असे ज्यावेळी वाटायला लागले त्याचवेळी त्यांच्या मनात विजयाबाबत शंकेची पाल चुकचुकत होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूक