शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंगणेवाडीतील कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल: विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:49 IST

मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने मोजक्या दिवसात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन २६ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देकृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल : खासदार विनायक राऊत आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने मोजक्या दिवसात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन २६ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व चाकरमान्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात येथील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख बबन शिंदे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक तथा गटविकास अधिकारी (कुडाळ) विजय चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव शेळके, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, भास्कर आंगणे, कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रमुख संदीप गिड्डे, माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, बाबा सावंत, बंडू चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी हेलिपॅड व्यवस्था व कृषी प्रदर्शन जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी मेळावे घेण्याबाबत तरतूद केली आहे. या योजनेतील पहिला मेळावा चंद्रपूर जिल्ह्यात झाला तर आंगणेवाडी येथे होणारा राज्यातील दुसरा मेळावा आहे.

चांदा ते बांदा या योजनेचा हा योगायोग असला तरी भव्य-दिव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने आमच्या सर्व अडचणी दूर करीत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. येथील शेतकºयांना आधुनिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.यावेळी कृषी प्रदर्शन सोहळ्याचे प्रमुख संदीप गिड्डे यांनी माहिती दिली. शासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार असून पशु संवर्धन जागरूकतेसाठी मुक्त गोठा, जलयुक्त शिवार योजनेतील यशोगाथा, पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी, शेतकरी अपघात विमा, क्वॉयर बोर्डाच्या उत्पादनाचे विविध डेमो दाखविले जाणार आहेत.मालवण तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कृषी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रेसर बनवून मालवण तालुका कृषी क्षेत्रात केंद्रबिंदू बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.

शेतकऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे काजू, नारळ तसेच भातशेतीचे हेक्टरी उत्पादन वाढले आहे. मुंबईस्थित चाकरमानीवर्गाची बहुतांशी जमीन पडीक राहते. त्यामुळे अशा जमिनी वापरात आणल्यास शेतीला चालना मिळेल, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

सिंधु सरस महोत्सवाला वन्स मोअरकृषी प्रदर्शनाच्या जोडीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सिंधु सरस महोत्सव होत आहे. याआधी मागील महिन्यात कुडाळ येथे हा महोत्सव यशस्वी झाला असून पुन्हा एकदा वन्स मोअर मिळाला आहे.

महोत्सवात कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नामांकित ६० बचतगटांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर विविध मालवणी पदार्थ बनविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीस बचतगट यात सहभागी होणार आहेत. २५ जानेवारीला या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून बचतगटांच्या मालालाही भरघोस भाव मिळेल, असा विश्वास सिंधु सरस महोत्सवाचे संयोजक विजय चव्हाण यांनी व्यक्त केला.

महोत्सव व कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने एक हजार रंगबिरंगी फुलझाडांचा फ्लॉवर शोही याचवेळी होणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagricultureशेती