शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सिंधुदुर्ग : घेराओनंतर सावंतवाडी पालिकेला अखेर वीज कर्मचारी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:09 IST

विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले.

ठळक मुद्देघेराओनंतर सावंतवाडी पालिकेला अखेर वीज कर्मचारी मिळालेजाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य

सावंतवाडी : विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले. त्यानंतर हा घेराओ मागे घेण्यात आला.सावंतवाडी विद्युत विभागाने १९८४ चे नियम दाखवून नगरपालिकेला दिलेले दोन वीज कर्मचारी काढून घेतले होते. नगरपालिका शहरवासीयांना विद्युत सुविधा देत असतात, मात्र विद्युत पोलवर चढण्याचे काम विद्युत विभागाचे कर्मचारी म्हणजेच वायरमनचे असते.गेले काही दिवस शहराला वायरमनच नसल्याने अनेक पोलवरील ट्युबलाईट बंद होत्या. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक होत याबाबत सतत पालिका प्रशासनास जाब विचारत असत. त्यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, शहरप्रमुख शब्बीर मणियार, शुभांगी पारकर, नितीन कारेकर, राजा वाडकर आदींनी मिळून विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना घेराओ घालत जाब विचारला. तसेच वीज कर्मचारी प्रथमच काढून घेण्यात आले त्याचे कारण काय, असा सवाल केला.त्यावर उपविभागीय अभियंता राजे यांनी मार्चची कामे असल्याने हे कर्मचारी काढून घेतले. ते आम्ही पूर्वतत देणार असे सांगितले. मात्र नगराध्यक्ष यांनी यापूर्वी कधीच असे झाले नाही. मग आताच का कर्मचारी काढून घेण्यात आले, असा सवाल केला. त्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते.यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव तसेच शहरप्रमुख शब्बीर मणियार चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांनी घेतलेले आक्रमक रूप बघून अखेर विद्युत विभागाने तातडीने वीज कर्मचारी पालिकेला देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच याबाबतचे लेखी पत्रही पालिकेला दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.आम्हाला आंदोलन करावे लागते हे दुर्दैव : साळगावकरविद्युत विभागाचा कारभार योग्य नाही. ते पोल आणण्यापासून विजेचा मीटर एखाद्याच्या घरात लागेपर्यंत ग्राहकाला पैशांसाठी सोडत नाहीत. मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काय करायचे, असा सवाल करत आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर ते दुर्दैव आहे. पण आम्ही शहराच्या हिताचे असेल त्याला प्राधान्य देऊ, असे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण