शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

सिंधुदुर्ग : २४० घरांना सतर्कतेचा इशारा, मालवण तहसील कार्यालयाकडून स्थलांतराच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:52 IST

गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा मालवण तहसील कार्यालयाकडून बजावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे२४० घरांना सतर्कतेचा इशारामालवण तहसील कार्यालयाकडून स्थलांतराच्या नोटिसा

सिंधुदुर्ग : गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा मालवण तहसील कार्यालयाकडून बजावण्यात येणार आहेत.मालवण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. मात्र, तीन दिवस अविरत बरसणाऱ्य पावसाने काल मध्यरात्री अधुनमधून हजेरी लावल्यानंतर सकाळपासून विश्रांती घेतली. सोमवारी अधुनमधून वीज पुरवठा खंडित होत राहिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने सायंकाळी मालवण तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रॉक गार्डन परिसरातील खाद्यपदार्थांचा एक स्टॉल कोसळून स्थानिक व्यावसायिकाचे नुकसान झाले. मालवणात आतापर्यंत ७५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मालवणात झालेल्या अतिवृष्टीमुळे देवली व धामापूर येथे दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला होता. यामुळे तालुका प्रशासनाने तालुक्यात धोकादायक स्थिती निर्माण झालेल्या भागातील घराना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्याचे काम हाती घेतले आहे.

यामध्ये देवली येथील २०, काळसे येथील १०, माळगाव येथील ७, धामापूर येथील ३, देऊळवाडा १०, मर्डे येथील १०, तसेच देवबाग येथील १८० अशा एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत.

नोटिसा बजावण्याचे काम तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठ्यांकडून सुरु आहे. तर मसुरे गावात संभावित पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रशासनाकडून संपूर्ण मसुरे गावाला जाहीर सूचना देण्यात आली आहे.पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मालवण तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून हा कक्ष ३१ आॅक्टोबरपर्यंत २४ तास सुरु राहणार आहे.

या कक्षामार्फत आपत्ती निवारणासाठी तालुक्याच्या शासकीय यंत्रणेतील वर्ग ४ चे २८ कर्मचारी, वर्ग ३ चे ६५ कर्मचारी तसेच मालवण तहसील कार्यालयातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.

आपत्ती काळात माहिती व मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांकावर तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग