शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

सिंधुदुर्ग : गावडेच्या घरातून २२ हजार जप्त, पैसे अन्य व्यक्तींच्या नावे ठेवल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:19 IST

नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून युवकांना लाखो रूपयांना चुना लावणारा सुनील गावडे याच्या सावंतवाडीत भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांना २२ हजारांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे हाती लागली आहेत.

ठळक मुद्दे गावडेच्या घरातून २२ हजार जप्तपैसे अन्य व्यक्तींच्या नावे ठेवल्याचा संशय पाच जणांच्या तक्रारी

सावंतवाडी : नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून युवकांना लाखो रूपयांना चुना लावणारा सुनील गावडे याच्या सावंतवाडीत भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांना २२ हजारांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे हाती लागली आहेत.तर त्याच्या बँक खात्याचीही झाडाझडती घेतली, पण त्यात रक्कम नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गावडे याने गंडा घातलेले पैसे स्वत:च्या खात्यावर न ठेवता तो अन्य कोणत्या तरी व्यक्तीच्या खात्यात ठेवत असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीनेही पोलीस चौकशी करीत आहेत.नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे भासवून अनेकांना लाखो रूपयांना गंडा घालणारा मूळ कणकवली-वागदे येथील सुनील गावडे याचे अनेक प्रताप बाहेर येऊ लागले आहेत. आतापर्यंत गावडे याच्या विरोधात पाच जणांनी तक्रारी दिल्या आहेत. या सर्वांची रक्कम २० लाखाच्या घरात आहे. पण प्रत्यक्षात गावडे याच्याजवळ झाडाझडती घेतली असता पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

पोलिसांनी गावडे यांची बँक खाती असलेल्या सर्व बँकाना पत्रे दिली आहेत. तर काही बँक खात्याची चौकशी केली आहे. पण या बँक खात्यात पैसे ठेवण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गावडे राहत असलेल्या लक्ष्मीनगर येथील भाड्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना २२ हजारांची रोकड आढळून आली. तर काही कागदपत्रेही सापडली आहेत. यात अनेक युवकांकडून नोकरीच्या निमित्तानेही कागदपत्रे गावडे याने घेतली होती.

तीच कागदपत्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गंडा घालून मिळविलेले लाखो रूपये गावडे याने कुठे ठेवले याचा पोलीस शोध घेत आहेत. गावडे याच्या अंगावर लाखो रूपये किमतीचे दागिने होते. तसेच अलिशान गाड्याही होत्या. पण यातील एकही गाडी त्याच्या नावावर नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच गंडा घालून मिळविलेले पैसेही गावडे याने कोणाच्या तरी नावावर ठेवले असावेत, असा संशय आहे.

तसेच तो अलिकडे नवनवीन दुचाकीही वापरत होता. या गाड्यांबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. गावडे हा सावंतवाडीत कसा आला, तसेच त्याने सावंतवाडीत आपले पहिले बस्तान कुठे बसवले. या सर्व खोलात पोलीस जाणार असून, पोलिसांनी ही माहिती घेतल्यास अनेक धक्कादायक प्रकार पुढे येऊ शकतात. मात्र सध्या पोलीस फसवणूक झालेल्या युवकांचे जबाब नोंदवत आहेत.अलिशान कार अन्य व्यक्तीच्या नावावर

सुनील गावडेकडे एक अलिशान कार होती. ही कार अन्य व्यक्तीच्या नावावर होती. सध्या ती कार पोलिसांना मिळत नाही. ही कार पोलिसांनी शोधून काढल्यास अनेक धक्कादायक प्रकार बाहेर येतील. पोलिसांच्या मते ही कार ज्या व्यक्तीकडून नोकरीच्या निमित्ताने पैसे घेतले होते, त्याला नोकरी न लावल्याने कार घेऊन गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सुनील गावडे हा पूर्वी उभाबाजार येथे राहत होता. तर अलिकडेच तो लक्ष्मीनगर येथे भाड्याच्या घरात राहण्यास गेला होता. या घरांची आम्ही झाडाझडती घेतली. यात आम्हाला रोख २२ हजार रूपये व नोकरीसाठी युवकांकडून घेतलेली कागदपत्रे आढळून आली आहेत. ती आम्ही जप्त केली असून, गावडेच्या बँक खात्याचीही तपासणी सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अरूण सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा