शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पोलीस दलातील १३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, आदेश प्राप्त : ६५ प्रशासकीय, ६८ विनंती बदल्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:23 IST

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ६८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा समावेश असून बदली पात्र कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे पोलीस दलातील १३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, आदेश प्राप्त ६५ प्रशासकीय, ६८ विनंती बदल्यांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ६८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा समावेश असून बदली पात्र कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यासाठीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी प्रशासकीय बदलीस पात्र ठरलेल्या ७५ व विनंती बदली अर्ज केलेल्या १२३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी बदलीसाठी सोयीचे ठिकाण, बदली मागण्याच्या कारणांचा विचार करण्यात आला. यात प्रशासकीय बदलीसाठी पात्र असलेल्या ७५ कर्मचाऱ्यांपैकी ६५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या १२३ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ६८ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.

१0 जणांच्या बदल्यांना स्थगितीएका ठिकाणी कामकाजाचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले ७५ पोलीस कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र होते. त्यापैकी ६५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही करणास्तव १० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पोलीस अधीक्षकांनी स्थगिती दिली आहे.

बदलीपात्र कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होऊन त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेणे व कौटुंबीक स्थैर्य या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठीच मे महिन्याच्या सुरुवातीलाच या बदल्या करण्यात आल्या आहेत.-दीक्षितकुमार गेडाम,जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग