शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थिनी श्रुती पाटील हिच्या लढ्याला अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:08 IST

इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थिनी श्रुती पाटील हिच्या लढ्याला अखेर यशदहावी प्रश्नपत्रिका मोठ्या अक्षरांची

वेंगुर्ला : इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीच्या लढ्याला अखेर यश आले आहे.वेंगुर्ला हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेली श्रुती दीपक पाटील ही अंशत: अंध आणि सेरेब्रल पाल्सी या त्रासाने ग्रासली आहे. आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती शिक्षण मंडळाने फेटाळून लावली होती.

दरम्यान, त्याविरोधात श्रुतीच्यावतीने अ‍ॅड. प्रोस्पर डिसोझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांची ही समस्या न्यायालयाने लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण मंडळाने केवळ विशेष बाब म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याची तयारी दर्शविली होती.मंगळवार ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या या सहकार्याबद्दल दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देणे सोईचे बनले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते. 

टॅग्स :ssc examदहावीsindhudurgसिंधुदुर्ग