शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना जागा दाखवा, परशुराम उपरकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:31 IST

Parshuram Upkar Sindhudurg- कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना जागा दाखवा, परशुराम उपरकर यांचे आवाहन प्रस्थापितांना जागा दाखविण्याची वेळ

कणकवली : कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनसेने कोरोना काळात सातत्याने चाकरमान्यांची बाजू घेतली. गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसांचे क्वारंटाईन करा, रॅपिड चाचणी करून त्यांना गावात प्रवेश द्या, असे आवाहन सर्वप्रथम मनसेनेच केले होते. मात्र, गावी आलेल्या चाकरमान्यांना त्रास देण्याचे काम तत्कालीन सरपंच, गावपुढारी यांनी केले.गणेशोत्सव कालावधीत अनेक चाकरमान्यांना गावागावांमध्ये मज्जाव करण्यात आल्याने त्यांना मुंबईतच गणेशोत्सव साजरा करावा लागला. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी गावी येत असतो. मात्र, या चाकरमान्यांना गावात येण्यास प्रस्थापित राजकारण्यांनी विरोध केलाचाकरमानी येण्यास मनसेने घेतला होता पुढाकारगणेशोत्सव कालावधीसाठी शासनाकडून चाकरमान्यांकरिता निकष निर्धारित करण्याअगोदरच सरपंच संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नियमावली तयार करून चाकरमान्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाकरमानी आणि त्यांचे नातेवाईक यांची मने कलुषित करण्याचा हा प्रयत्न होता. अशावेळी चाकरमानी गावात यावेत, यासाठी मनसेने सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.

आज मनसेने काही ठरावीक उमेदवार उभे केले असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याचे काम ते करणार आहेत. त्यामुळे मतदारांनी या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देत मनसेच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही उपरकर यांनी या पत्रकातून केले आहे..

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग