शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एकी दाखवा, अन्यथा काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही : गणेश हिमगिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:41 IST

तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या ...

ठळक मुद्देएकी दाखवा, अन्यथा काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही : गणेश हिमगिरे मळगाव येथील काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेत प्रतिपादन

तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या देशातील काजूला अधिकचा झाला आहे. त्यामुळे आता यापुढे काजू बी जीआय मानांकनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच ब्रँड तयार होईल. अन्यथा आपल्या काजूची अवस्था कांद्यासारखी होईल, असा इशारा अनेक वस्तंूना जीआय मानांकन मिळवून देणारे सांगली येथील प्रा. गणेश हिमगिरे यांनी दिला आहे.ते मळगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डान्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, गुरूनाथ पेडणेकर, माजी अध्यक्ष गजानन गावडे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर बांदेकर, सुधाकर नेरूरकर, एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी आदी उपस्थित होते.हिमगिरे पुढे म्हणाले, काजू उत्पादनाला अधिक किंमत जागतिक बाजारपेठेत मिळवायची असल्यास काजू पिकास जीआय मानांकन प्राप्त करणे आवश्यक आहे. एकजूट ठेवल्यास आपण आपले शेती उत्पादन जागतिक बाजारपेठेत नेऊ शकतो. काजू शेतकऱ्यांची संघटना मजबूत करा. तरच आपण आपले उत्पादन टिकवू शकतो. आज केरळचा काजू परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. याचे कारण म्हणजे केरळ काजू जीआय मानांकन प्राप्त आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादनातून दरवर्षी १२०० ते १३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. पण कोकणातील शेतकरी जागतिक जीआय मानांकनापासून अनभिज्ञ असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यशाळेचे उद्घाटन गणेश हिमगिरे व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. हिमगिरे यांचा जिल्हा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माराम ओटवणेकर, प्रकाश गवस, दादा साईल आदी उपस्थित होते.काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्जसतीश सावंत म्हणाले, जीआय मानांकनामुळे आपण आपला काजू जागतिक बाजारपेठेत अधिक दराने विकू शकतो. यासाठी शेतकरीवर्गाने एकजूट दाखविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू शेतकरीवर्गास जिल्हा बँक प्रति काजू झाड ६०० रुपये कर्ज देण्यात येणार आहे. तर जीआय मानांकन प्राप्त काजू झाडाला ७०० रुपये कर्ज देणार, असे यावेळी सावंत यांनी जाहीर केले. यासाठी नवीन योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :foodअन्नsindhudurgसिंधुदुर्ग