शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आचरा येथे त्या दुकानदारांनी मोडला नियम : पोलिसांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:21 IST

आचरा : देशभरात लॉकडाऊन वाढल्याच्या आदेशानंतरसुद्धा आचरा परिसरात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून इतर दुकाने काही व्यापाऱ्यांनी चालू ठेवली ...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आचरा : देशभरात लॉकडाऊन वाढल्याच्या आदेशानंतरसुद्धा आचरा परिसरात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून इतर दुकाने काही व्यापाऱ्यांनी चालू ठेवली होती. यामुळे आचरा तिठा ते बाजारपेठ परिसरात दिवसागणिक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आचरा पोलिसांच्या हे निदर्शनास आणून देताच पोलिसांनी जीवनावश्यक सेवेत न मोडणाºया दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगून पुन्हा दुकाने चालू ठेवलेली आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जीवनावश्यक वस्तूंमध्ये न मोडणा-या काही व्यापाºयांनी आपली दुकाने लॉकडाऊन कालावधी वाढल्यानंतर चालू केल्याचे दिसत होते. याला माजी बांधकाम सभापती व आचरा व्यापारी जेरोन फर्नांडिस यांनी आक्षेप घेत आचरा पोलीस व आचरा सरपंच प्रणया टेमकर यांचे लक्ष वेधले होते.

गुरुवारी सकाळी १० वाजता आचरा तिठा येथे आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना जेरॉन फर्नांडिस यांनी जीवनावश्यक सेवा देण्याव्यतिरिक्त इतर दुकाने उघडी असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी सरपंच प्रणया टेमकर, आचरा दक्षता समिती सदस्य मंगेश टेमकर, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत, पत्रकार, व्यापारी उपस्थित होते.

यावेळी जयदीप कळेकर यांनी नियम मोडणाºया व्यापाºयांना आज समज देतो व उद्या जे नियम मोडून दुकाने उघडी ठेवतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षक कळेकर यांनी आचरा तिठा ते बाजारपेठमधील प्रत्येक दुकानाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. नियम मोडून चालू केलेली दुकाने बंद करण्यास त्यांनी सांगितले. शुक्रवारी जीवनावश्यक सेवा देणाºया दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने चालू केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.आचरा तिठा येथे नियम मोडणाºयांवरच्या कारवाईबाबत आचरा पोलीस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी सरपंच प्रणया टेमकर, जेरॉन फर्नांडिस व इतर समिती सदस्यांनी चर्चा केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस