शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीर पुरंदरेंचे सिंधुदुर्गशी होते विशेष ऋणानुबंध, 'ते' स्वप्न राहिले अपुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 19:07 IST

माजी आमदार परशुराम उपरकर यांनाच सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ एक कलादालन उभारण्याचे त्यांनी ठरवले होते. या कलादालनातून महाराजांचा इतिहास प्रकटला जाणार होता.

अनंत जाधवसावंतवाडी : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे  निधन झाले आणि त्यांचे अलौकिक कार्य प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आले. संपूर्ण जगात शिवशाहीर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बाबासाहेबांचे सिंधुदुर्गशी विशेष ऋणानुबंध होते. त्याचे मालवण येथे कलादालन उभारण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. अनेक वेळा बाबासाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांनी सिंधुदुर्ग किल्याला अनेक वेळा भेटी दिल्या. ते किल्ल्यावर गेले की महाराजांच्या आठवणीत रममाण होत होते. सिंधुदुर्ग वासियाच्या आग्रहाखातर दोनवेळा जाणता राजा हे नाटक ही जिल्ह्यात आणले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक शिवसृष्टीच उभी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक विचार आणि कार्य युवा पिढी बरोबरच जुन्या पिढी पर्यंत पोचविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांच्या सिंधुदुर्ग बद्दलच्या अनेक आठवणी आहेत. ते वर्षातून सात ते आठ वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असत सिंधुदुर्ग किल्यावर गेले की ते शिवाजी महाराजांच्या आठवणीत रममाण होत असत. महाराज कसे किल्यावर पोचले आणि कसा इतिहास साकारला हे सांगत असताना समोर असलेल्या शिवप्रेमींना ही एक वेगळीच उर्जा त्याच्यात दिसून येत असे.

जिल्ह्यात आल्यावर ते माजी आमदार परशुराम उपरकर याच्या शिवाय कुठे ही जात नसत. जिल्ह्यातील शाळा शाळामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराज यांच्या वर व्याख्याने दिली. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे महाराजा बद्दल वेगवेगळ्या आठवणी होत्या. जाणता राजा हे त्यांचे नाटक सिंधुदुर्ग वासियासाठी एक पर्वणीच होती. या ठिकाणी तसे हे नाटक करणे अवघड होते पण उपरकर याच्या पुढाकारातून हे नाटक जिल्ह्यात आणले.

बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, त्यांनी उपरकर यांनाच सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ एक कलादालन उभारण्याचे ठरवले होते. या कलादालनातून महाराजांचा इतिहास प्रकटला जाणार होता. जेणे करुन भावी पिढीला पासून अबाल वृध्दापर्यत सर्वाना इतिहास समजला पाहिजे यासाठी हा सर्व त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी मालवण सुकळवाड येथे जागा ही पाहिली होती. आणि काही जागेच्या शोधात ते होते.

पण दहा दिवसापूर्वीच बाबासाहेबांनी उपरकर यांच्याशी संपर्क करत मी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो आहे. आपले ते कलादालनाचे काम लवकर पूर्ण करूया असे सांगितले होते. मात्र अखेर आज त्यांच्या मृत्यूचीच बातमी कानावर आली आणि त्यांचे कलादालन उभारण्याचे स्वप्न ही अपुरे राहिल्याचे शल्य कायम राहिले.

विनम्रपणा ही बाबासाहेबांना देण

बाबासाहेब हे महाराजांवर व्याख्यान देण्यासाठी अनेक ठिकाणी जात. लहानशा गावात ही ते गेले त्यांना कुणीही आपल्या घरी बोलवले तर ते कधी जाणे नाकारत नसत. आवडीने सर्व सामान्यांच्या घरी जात त्याच्यात असलेला विनम्रपणा हा अनेकांना भावत असे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे