शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दोडामार्गात शिवजयंती होणार शाही उत्साहात

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

कमिटीची स्थापना : देखाव्यांसह महानाट्याचे सादरीकरण

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवजयंती महोत्सव तिथीप्रमाणे ८ मार्च रोजी दोडामार्ग येथे भव्य दिव्य अशा स्वरूपात होणार आहे. महोत्सवाच्या नियोजनासाठी तालुक्याची कोअर समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.शिवजयंती महोत्सवानिमित्त साटेली - भेडशी गोवेकर कलामंच येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीला नवनाथ बोराडे, गणेश ठाकूर, निखिल नाईक, साईनाथ डुबळे, नीलेश गोवेकर, प्रदीप उर्फ अम्या मयेकर, कानू दळवी, सतिश परब, नीलेश गवस, जयवंत आठलेकर, भरत दळवी, नीलेश साळगावकर, नीलेश धर्णे, मुकूंद नाईक, अमित बिडये, भिवा गवस, महादेव नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कोअर कमिटीचे गणेश ठाकूर म्हणाले, शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उत्तुंग हिमालयासारखे त्यांचे काम आहे. म्हणून आज ३५0 वर्षानंतर ही जगात नाव घेतले जाते. येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचे आचारविचार समजावेत. त्यांचे गुण आत्मसात करावेत. यासाठी महोत्सव कार्यक्रम होणे आवश्यक आहेत. राजे हे आमचे दैवत असल्यामुळे कठीण प्रसंगी तुम्ही त्यांचे स्मरण कराल तर निश्चित मार्ग मिळेल. महोत्सव कार्यक्रमाचे स्वरूपामध्ये चार ठिकाणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यामध्ये तिलारी, साटेली - भेडशी, सासोली, दोडामार्गमध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. मर्दानी खेळ घाटमाथ्यावर होतात. या खेळाचे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यातील तरूणांना मिळाले पाहिजे. बाजीप्रभुंनी दोन हातात तलवारी घेऊन पावनख्ािंड लढविली. दोन हातात तलवारी घेऊन कसे दुश्मनाशी लढता येईल, याचे प्रात्यक्षिक होणार आहे. या मर्दानी खेळातून तरूणांनी आपलं आत्मसंरक्षण करावं यातून दिसणार आहे.दुसऱ्या जलाभिषेकाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातून प्रत्येक गावात शिवप्रेमी आहेत. प्रत्येक गावातून एका कुटुंबाने गावातील जलकुंभ घेऊन दोडामार्ग महोत्सव ठिकाणी यायचं आहे. याच पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक होणार आहे.शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्रावर महानाट्यप्रयोग सादर होणार आहे. यासाठी सासोलीतील शिवप्रेमी गणेश ठाकूर यांनी ५0 फूट उंचीचा मोठा आकर्षक किल्ला बनविलेला आहे. हा किल्लाच म्हणजे प्रमुख आकर्षण बनणार आहे. महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात आहोत, असा भास होणार आहे. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलणारे ख्यातनाम वक्ते महोत्सवात मार्गदर्शन करणार आहेत. ८ मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याने प्रत्येक कार्यक्रमासाठी कोअर समितीमार्फत समित्या नेमण्यात येणार आहे. या समित्यांमध्ये तालुक्यातील युवक, युवतींनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील शिवजयंतीचा आवाज महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचे स्वरूप या महोत्सवाचे असणार आहे. याकरीता तालुका, जिल्हापातळीवरील सर्व राजकीय नेतेमंडळी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, नोकरवर्गाचा उस्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)