शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेने घेतला मोकळा श्वास, मालवण बंदर जेटीवरील आवारात होती जमिनीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:03 IST

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता दुर्गसंवर्धन चळवळीचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पंधरा शिलेदारांनी तोफ बाहेर काढली

मालवण : ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता दुर्गसंवर्धन चळवळीचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पंधरा शिलेदारांनी मालवण बंदर जेटीवरील कस्टम कार्यालयाच्या आवारात असलेल्या आणि वर्षोनुवर्षे सुमारे चार फूट जमिनीखाली अर्धवट उलटी करून गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेला शुक्रवारी मोकळा श्वास दिला.याबाबत संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुण्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  मालवण बंदर जेटीवर असणाऱ्या कस्टम कार्यालयाच्या प्रांगणात कित्येक वर्षे एक शिवकालीन तोफ जमिनीत उलटी करून अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होती. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि इतिहास अभ्यासक  गणेश रघुवीर हे २०१९ साली मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गला आले होते. त्यावेळी मालवण बंदर जेटीवरील कस्टम ऑफीसच्या आवारात असलेली उलट्या अवस्थेत जमिनीत गाडली गेलेली उभी शिवकालीन तोफ निदर्शनास आली.त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या आपल्या शिलेदारांच्या कानी ही गोष्ट घातल्यानंतर या तोफेला जमिनीतून बाहेर काढण्याचे ठरले आणि सन २०१९पासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्गने हालचाली सुरू करून कस्टम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केला. अखेर या प्रयत्नांना यश आल्याने २३ मे २०२५ रोजी ही तोफ बाहेर काढण्याचे ठरले.शुक्रवारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्गचे अध्यक्ष - सुनील राऊळ, उपाध्यक्ष - रामचंद्र आईर, तसेच शिलेदार एकनाथ गुरव, कार्तिक गोसावी, साहिल आईर, ओमप्रकाश नाईक, मंदार सावंत, बंटी आईर, अश्विन गाड, दिनेश आंगणे, प्रज्वल कोयंडे, मनीष गावडे, यशराज कोयंडे, ओजस परब, उमेश खडपकर, गजानन दळवी हे सकाळी नऊ वाजता जमा झाल्यानंतर साकडे घालण्यात आले. सुमारे आठ तासांनंतर जमिनीत अर्धवट अवस्थेत पुरण्यात आलेली ही तोफ बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.  वर्षानुवर्षे गाडलेल्या स्थितीततोफेच्या बाजूलाच छोटेखानी देवालय असून, त्याठिकाणी पूजा अर्चा होत असे. मात्र, इतिहास साक्षी असलेली ही तोफ वर्षानुवर्षे गाडलेल्या स्थितीत असल्याने ती सर्वांसमोर यावी, तोफेचे योग्य संवर्धन व्हावे, या हेतूने दुर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेकडून ही तोफ कठडा व जमिनीतून बाहेर काढण्यात आली.संवर्धन करण्यात येणारयासाठी कस्टम विभाग, मालवण आणि मेरीटाइम बोर्ड (बंदर विभाग) मालवण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाहेर काढलेली ही तोफ ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग अथवा किल्ले राजकोट याठिकाणी ठेवून तिचे संवर्धन करण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग